'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत विल स्मिथला बॉलिवूड सिनेमात करायचंय काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 16:56 IST2018-10-06T16:54:54+5:302018-10-06T16:56:33+5:30

ह़ॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांचं बॉलिवूड प्रेम वेळोवेळी व्यक्त केलं आहे. त्यांनी बॉलिवूड सिनेमात काम करण्याचीही इच्छा बोलून दाखवली आहे.

Hollywood Star Will Smith want to act with Aishwarya Rai Bachchan | 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत विल स्मिथला बॉलिवूड सिनेमात करायचंय काम!

'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत विल स्मिथला बॉलिवूड सिनेमात करायचंय काम!

मुंबई : ह़ॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांचं बॉलिवूड प्रेम वेळोवेळी व्यक्त केलं आहे. त्यांनी बॉलिवूड सिनेमात काम करण्याचीही इच्छा बोलून दाखवली आहे. आता हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथ यानेही बॉलिवूड सिनेमातच नाही तर एका खास अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. 

हिंदुस्थान टाईम्सच्या लिडर समिटमध्ये विल स्मिथ आला होता. यावेळी बोलताना तो म्हणाला की, त्याला ऐश्वर्या राय-बच्चनसोबत बॉलिवूड सिनेमात काम करायचं आहे. 

विल म्हणाला की, 'साधारण १५ वर्षापूर्वी माझी आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. त्यावेळी आम्ही दोघांनीही एका सिनेमात काम करण्याचं ठरवलं होतं. पण तसं होऊ शकलं नाही. मात्र पुढे मला तिच्यासोबत सिनेमात काम करायला नक्की आवडेल'.

विलने त्याच्या बालपणाबाबत सांगितले की, 'माझं बालपण फार चांगलं नव्हतं. मला जसं जगायचं होतं, तसं मला जगता आलं नाही. मी फार हिंसा सहन केली आहे. त्यामुळे मला माझ्या मुलांना चांगलं जीवन द्यायचं आहे'.

विल म्हणाला की, 'बॉक्सर मोहम्मद अली यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी फार खास गोष्ट होती. या भूमिकेने मला नेहमीसाठी बदलून टाकलं. एक अभिनेता म्हणून हे फार खास गोष्ट आहे की, ज्या व्यक्तीला तुम्ही पसंत करता, त्या व्यक्तीची भूमिका साकारायची संधी तुम्हाला मिळते'.

Web Title: Hollywood Star Will Smith want to act with Aishwarya Rai Bachchan