Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:55 AM2024-03-26T10:55:26+5:302024-03-26T11:01:33+5:30

होळी हा सण विशेष करुन रंगांचा सण म्हणून ओळखला जातो.

Holi 2024: Dimple Queen Preity Zinta drops pictures from her Holi celebration | Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा!

Holi 2024: रंगात रंगली डिंपल क्वीन, प्रिती झिंटानं चाहत्यांना दिल्या धूलिवंदनाच्या खास शुभेच्छा!

होळी हा सण विशेष करुन रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत जवळपास सर्वजण आनंदाने होळी हा सण साजरा करतात. फक्त भारतातमध्ये नाही तर विदेशातही होळीची उत्साह दिसून आला. लग्न करुन परदेशात गेलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रिती झिंटानं देखील चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रिती झिंटानेही सोशल मीडियावर #Throwback असा हॅशटॅग देत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये प्रिती झिंटा तिचा नवरा जीन गुडइनफसोबत होळीच्या रंगात रंगलेली दिसत आहे. दोघेही खूप आनंदी दिसून येत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. लग्नानंतर प्रीती अमेरिकेत शिफ्ट झाली होती. प्रीती सोशल मीडियावर सक्रीय असून यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. ती कायम तिच्या मुलांसोबत आणि पतीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.

होळीच्या निमित्ताने थ्रोबॅक फोटो शेअर करताना प्रिती झिंटाने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. प्रीती झिंटाने पुढे लिहिले की, रंगांचा हा सण तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचे रंग घेऊन येवो. प्रीती अलीकडेच पंजाब किंग्जला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. जिथे ती देसी लूकमध्ये  पाहायला मिळाली होती.  स्टेडियममधील तिच फोटो व्हायरल झाले होते. 

डिंपल क्वीन प्रीती आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. प्रितीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. 2016 मध्ये Gene Goodenough याच्याशी लग्न केल्यानंतर, ती चित्रपटांमध्ये कमी एक्टिव्ह दिसते. लग्नाच्या 5 वर्षानंतर सरोगसीच्या माध्यमातून अभिनेत्रीला दोन जुळी मुलं झाली आहेत. प्रीती सध्या पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे. चाहते तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत.
 

Web Title: Holi 2024: Dimple Queen Preity Zinta drops pictures from her Holi celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.