अमृता फडणवीस यांचे हे गाणं होतायेत सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:24 IST2019-08-06T16:21:28+5:302019-08-06T16:24:32+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. शाहिद कपूरच्या करिअरमध्ये इतकी कमाई करणार हा पहिला सिनेमा ठरला आहे.

अमृता फडणवीस यांचे हे गाणं होतायेत सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. शाहिद कपूरच्या करिअरमध्ये इतकी कमाई करणार हा पहिला सिनेमा ठरला आहे. केवळ २५ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटी रुपये कमावले..या सिनेमासोबतच या सिनेमातील गाणीही रसिकांना प्रचंड आवडली. कबीर सिंग हा तेलगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे. या सिनेमात तेरा बन जाऊंगी हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय होत आहे. या गाण्याचे फिमेल व्हर्जन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. हे गाणं सोशल मिडियावर सध्या तुफान ट्रेंडमध्ये आहे.
या गाण्याला युट्यूूबर ४० लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अमृता फडणवीस यांचं गाण्याचं प्रेम सर्वश्रृत आहे. याआधी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एक गाणं गायलं होतं.विशेष म्हणजे त्या व्हिडिओला नेटीझन्सकडून प्रचंड लाइक्सही मिळाले होते. ऐवढेच नाही तर एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील ‘मै दिवानी, मै मस्तानी’ या गाण्यावर डान्स करताना अमृता फडणवीस या व्हिडिओत दिसल्या होत्या.