सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; नायकापेक्षाही जास्त होती त्यांची फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:13 IST2026-02-23T12:12:52+5:302026-02-23T12:13:54+5:30

Bollywood actor: 'तो' अभिनेता ज्याने खलनायक होऊन घेतली नायकापेक्षाही जास्त फी

highest-paid-villain-in-bollywood-negative-role-actor-pran-fees-in-movies | सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; नायकापेक्षाही जास्त होती त्यांची फी

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; नायकापेक्षाही जास्त होती त्यांची फी

बॉलिवूडमधील प्रतिभावंत खलनायकांचा उल्लेख ज्यावेळी होतो तेव्हा शेर खान अर्थात अभिनेता प्राण यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. दमदार अभिनयशैली आणि भारदस्त आवाज यांच्या जोरावर प्राण यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. विशेष म्हणजे त्यांच्या याच अंदाजामुळे ते बॉलिवूडचे 'व्हिलन नंबर 1' सुद्धा ठरले. एक काळ असा होता जेव्हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकांरांच्या यादीत प्राण यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जायचं.

प्राण (pran) यांनी त्यांच्या करिअरमध्ये ४०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. उत्तम अभिनयामुळे लोकप्रिय झालेले प्राण हे एकेकाळी लीड रोल करणाऱ्या अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेत होते. त्या काळात प्राण यांच्याशिवाय एखादा सिनेमा केला तर तो सिनेमा प्रेक्षकांना अपूर्ण असल्यासारखा वाटायचा. त्यामुळे प्राण यांना आपल्या सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असायचे.

१९७३ मध्ये रिलीज झालेला जंजीर हा सिनेमा प्राण यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या सिनमानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. या सिनेमात त्यांनी शेर खान ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करुनही त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान, प्राण यांनी 'आजाद', 'मधुमति', 'देवदास', 'राम और श्याम' 'डॉन' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं.

Web Title : प्राण: खलनायक जो हीरो से ज्यादा कमाते थे।

Web Summary : प्राण, बॉलीवुड के प्रसिद्ध खलनायक, मुख्य अभिनेताओं से अधिक कमाते थे। उन्होंने 400 से अधिक फिल्मों में अभिनय किया। 'जंजीर' में उनकी भूमिका ने अमिताभ बच्चन के साथ उनकी लोकप्रियता को मजबूत किया, 'डॉन' जैसी हिट फिल्मों में भी काम किया।

Web Title : Pran: The villain who earned more than the hero.

Web Summary : Pran, Bollywood's iconic villain, earned more than leading actors. He starred in over 400 films, becoming a sought-after presence. His role in 'Zanjeer' cemented his popularity alongside Amitabh Bachchan in hits like 'Don'.