'हे बेबी'मधील ती चिमुरडी आता 21 वर्षांची! खळी पाहून चाहते म्हणाले ही तर प्रीती झिंटाची कॉपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:54 IST2025-06-04T11:33:32+5:302025-06-04T11:54:08+5:30

'हे बेबी' सिनेमातली चिमुकली आठवतेय? लेटेस्ट फोटो आला समोर

Heyy Babyy Child Actor Juanna Sanghv Is All Grown Up See Her Photo | 'हे बेबी'मधील ती चिमुरडी आता 21 वर्षांची! खळी पाहून चाहते म्हणाले ही तर प्रीती झिंटाची कॉपी!

'हे बेबी'मधील ती चिमुरडी आता 21 वर्षांची! खळी पाहून चाहते म्हणाले ही तर प्रीती झिंटाची कॉपी!

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक बालकलाकारांनी अभिनय केलाय. आता काही चित्रपटांना वीस-पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे तेव्हा लहान असणारे हे कलाकार आता आपल्या ऐन तारुण्यात आले आहेत. 
 २००७ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान स्टारर चित्रपट 'हे बेबी'मधील छोटी चिमुरडी आता २१ वर्षांची झाली आहे. तिचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत.

'हे बेबी' हा सिनेमा आजही तेवढ्याच आवडीने चाहते पाहतात. हा चित्रपट जितका विनोदी होता, तितकाच तो भावनिकही आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांनी साकारलेल्या पात्रांनी प्रेक्षकांना भरभरून हसवलं, पण या सगळ्यांच्या अभिनयावर एक छोटीशी गोंडस चिमुरडी भारी पडली होती. ती म्हणजे 'एंजेल'. ही चिमुरडी दुसरी-तिसरी कोणी नसून जुआना संघवी होती.

 चित्रपटात आपल्या निरागस हावभावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी जुआना आता चर्चेत आली आहे.  अलीकडेच तिच्या बर्थडे पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २१ वर्षांची झालेली जुआना आता खूप बदलली आहे. तिच्या अलीकडील फोटोंमध्ये ती ओळखणंही कठीण झालं आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत, तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची विनंती केली आहे. तिच्या गालावर पडणारी खळी पाहून तर अनेकांनी तिची तुलना थेट अभिनेत्री  प्रीती झिंटासोबत केली आहे. 

Web Title: Heyy Babyy Child Actor Juanna Sanghv Is All Grown Up See Her Photo