टायगर श्रॉफला पाहताच तरुणीला आली चक्कर; पण तिच्या या कृतीमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 03:50 PM2022-04-26T15:50:19+5:302022-04-26T15:53:01+5:30

Tiger Shroff: अलिकडेच टायगरने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र, यावेळी त्याला पाहून एका तरुणीला चक्कर आली.

heropanti 2 promotion fan fainted after seeing tiger shroff actor hugged her watch video | टायगर श्रॉफला पाहताच तरुणीला आली चक्कर; पण तिच्या या कृतीमुळे झाली ट्रोल

टायगर श्रॉफला पाहताच तरुणीला आली चक्कर; पण तिच्या या कृतीमुळे झाली ट्रोल

googlenewsNext

सध्याच्या घडीला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम प्रयत्नशील असतात. यामध्येच अभिनेता टायगर श्रॉफ (tiger shroff) याची तरुणींमध्ये कमालीची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. स्मित हास्य आणि फिटनेसमुळे टायगर तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अलिकडेच टायगरने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र, यावेळी त्याला पाहून एका तरुणीला चक्कर आली. विशेष म्हणजे या तरुणीला अशाही अवस्थेत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर टायगर आणि त्याच्या चाहतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये टायगरने मुंबईतील एका कार्यक्रमात आपल्या आगामी 'हिरोपंती 2' (heropanti 2) च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री तारा सुतारियादेखील  (tara sutaria)त्याच्यासोबत होती. विशेष म्हणजे या प्रमोशनमध्ये टायगरला पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. यात एका चाहतीला टायगरला पाहून चक्कर आली.

टायगरची एक झलक पाहता यावी यासाठी ही तरुणी कित्येक तासांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे टायगरला पाहिल्यानंतर तिला चक्कर आली. मात्र टायगरला जवळून भेटल्याशिवाय ही तरुणी इथून जायला तयार नव्हती. परिणामी, टायगरने तिला मंचावर बोलवून तिची गळाभेट घेतली. 

दरम्यान, या तरुणीला अनेक जण खालती बसण्यास किंवा तेथून निघून जाण्यास सांगत होते. मात्र, ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्टाला पेटली होती. टायगरला भेटल्याशिवाय जाणार नाही असा हट्ट तिने धरला. त्यामुळे टायगरने या तरुणीला मंचावर बोलावलं आणि तिला मिठी मारली. परंतु, या मुलीने जो हट्ट धरला होता तो पाहून नेटकऱ्यांची तिची तुलना एका लहान मुलासोबत केली आहे. 'अखेर..टायगरला त्याची लहान मुलगी सापडली', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'हे एकदम लहान मुलांसारखंच वाटतंय', असंही एका युजरने म्हटलं आहे.

Web Title: heropanti 2 promotion fan fainted after seeing tiger shroff actor hugged her watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.