'हेरा फेरी ३'मधून परेश रावल बाहेर, 'बाबूराव'चा रोल आता कोण करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:18 IST2025-05-21T17:12:56+5:302025-05-21T17:18:53+5:30
ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमधून परेश रावल यांनी का माघार घेतली ?

'हेरा फेरी ३'मधून परेश रावल बाहेर, 'बाबूराव'चा रोल आता कोण करणार?
Paresh Rawal: बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी 'हेरा फेरी' फ्रँचायझीचा तिसरा भाग म्हणजेच 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3) सिनेमाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रेक्षक आनंदी झाले होते. पण, आता प्रेक्षकांच्या आनंदावर पाणी फिरणार आहे. बहुप्रतिक्षित सीक्वेल 'हेरा फेरी ३' मधून अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) बाहेर पडल्याने हा चित्रपट वादात अडकला आहे. परेश रावल यांचं हे वर्तन 'अनप्रोफेशनल' असल्याचा आरोप अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) बाजूने करण्यात आलाय. एवढेच नाही तर अक्षय कुमारनं परेश रावल यांना तब्बल २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. या सर्व वादात आता 'हेरा फेरी ३' येणार का? परेश रावल यांच्या जागी इतर कुणाला घेणार का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
परेश रावल यांनी 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी'मध्ये साकारलेली बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका अजरामर केली होती. अप्रतिम अभिनयामुळे बाबूराव हे पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून बसलं आहे. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की, बाबूरावचा रोल कोण साकारणार?. यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तर फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे बाबूरावच्या भूमिकेला न्याय देऊ शकतात. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बऱ्याच अभिनेत्यांची नावे सुचवली आहेत. यात पंकज त्रिपाठी, नाना पाटेकर, विजय राज, ब्रह्मानंदम, बोमन ईरानी, गजराज राव, संजय मिश्रा, आणि अन्नू कपूर यांचे नावे पुढे येत आहेत. हे सगळेच कलाकार त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी आणि भन्नाट कॉमिक टाइमिंगसाठी प्रसिद्ध आहेत.
Top 4 artist who can play Babu Bhaia Character or any other character who replaces Babu Bhaia entire character
— Sher Ahmed Baloch🇵🇰 (@SherAhmed786) May 20, 2025
1 - Pankaj Tripathi
2 - Nana Patekar
3 - Vijay Raaz
4 - Brahmanandam
What You Think#HeraPheri3#BabuBhaia#PankajTripathi#NanaPatekar#VijayRaaz#Brahmanandampic.twitter.com/NroLdam4Nq
परेश रावल का बाहेर पडले?
परेश रावल यांनी क्रिएटिव्ह डिफरन्समुळे चित्रपटातून काढता पाय घेतला, अशी चर्चा सुरुवातील सुरू होती. मात्र, तसं नसल्याचं स्वतः परेश रावल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केलं होतं. त्यामुळं या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमधून परेश रावल यांनी का माघार घेतली असेल, यामागचं कारण कोणालाच समजले नाही. सध्या तरी 'हेरा फेरी ३' मध्ये बाबूरावच्या भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परेश रावल पुन्हा चित्रपटात परततील का, की त्यांची जागा दुसरा अभिनेता घेईल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.