धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत हेमा मालिनींचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “ते अमेरिकेला...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:45 IST2023-09-13T12:43:27+5:302023-09-13T12:45:14+5:30

धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनेत्याच्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.

hema malini shared dharmendra health update said he is totally fine | धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत हेमा मालिनींचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “ते अमेरिकेला...”

धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत हेमा मालिनींचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “ते अमेरिकेला...”

काही दिवसांपूर्वीच सनी देओल धर्मेंद्र यांच्याबरोबर अमेरिकेला गेल्याचं वृत्त होतं. धर्मेंद्र यांच्यावर उपचार करण्यासाठी सनी देओल त्यांना अमेरिकेला घेऊन गेल्याचं समजलं होतं. त्यानंतर धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत चाहत्यांना चिंता सतावू लागली होती. त्यांना अमेरिकेला नेमकं का घेऊन जाण्यात आलं, याबाबत काहीच स्पष्टता न मिळाल्यामुळे चाहते चिंतेत होते. आता धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनेत्याच्या तब्येतीबाबत खुलासा केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत दोन आठवडे उपचार होणार आहेत. धर्मेंद्र ८७ वर्षांचे असून त्यांच्या तब्येतीसंबंधात काही समस्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत पुढील उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेमा मालिनींनी टाइम्स नाऊला याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाला, “धर्मेंद्र यांची तब्येत एकदम ठीक आहे. ते अमेरिकेला रुटीन चेकअपसाठी गेले आहेत. काळजी करण्याचं काहीच कारण नाही.”

धर्मेंद्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. शबाना आझमी आणि धर्मेंद्र या जोडीला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. चित्रपटातील त्यांच्या किसींग सीनचीही प्रचंड चर्चा झाली होती.  

Web Title: hema malini shared dharmendra health update said he is totally fine