"त्याने खूप कर्ज घेतलंय, अजूनही फेडतेय.." फराह खानने दिलीपला म्हटलं "उंदीर", बाबा रामदेव म्हणाले - "६० वर्षांची म्हातारी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:25 IST2025-09-16T10:24:52+5:302025-09-16T10:25:19+5:30
Farah Khan And her cook Dilip met Ramdev Baba: फराह खान सध्या तिच्या युट्यूब चॅनेलवर कुकिंग व्लॉग्स बनवत आहे, ज्यात ती तिचा कुक दिलीपसोबत प्रसिद्ध व्यक्तींसोबत व्हिडीओ शूट करते. यावेळी ती हरिद्वारला पोहोचली आणि बाबा रामदेव यांच्याशी तिची भेट झाली.

"त्याने खूप कर्ज घेतलंय, अजूनही फेडतेय.." फराह खानने दिलीपला म्हटलं "उंदीर", बाबा रामदेव म्हणाले - "६० वर्षांची म्हातारी"
फराह खान (Farah Khan) सध्या तिच्या युट्यूब चॅनेलवर कुकिंग व्लॉग्स बनवत आहे, ज्यात ती तिचा कुक दिलीपसोबत प्रसिद्ध व्यक्तींसोबत व्हिडीओ शूट करते. यावेळी ती हरिद्वारला पोहोचली आणि बाबा रामदेव यांच्याशी तिची भेट झाली. तिथे पोहोचल्यावर दिलीपने बाबांचे पाय धरले आणि म्हणाला, "मी तुमचा खूप मोठा भक्त आहे." यावर विनोदी पद्धतीने उत्तर देत बाबा रामदेव (Baba Ramdev) म्हणाले, "तू मोठा कुठे आहेस, तू तर खूप छोटा भक्त आहेस."
व्लॉगमध्ये बाबा रामदेव यांनी फराह खानला विचारले की तिला दिलीप कसा भेटला? यावर फराह म्हणाली, "मला तो भेटला नाही, देवाने त्याला माझ्याकडे पाठवले." यावर बाबा हसले आणि त्यांनी दिलीपला "क्युट" म्हटले. फराहने लगेच त्यांना टोकत विचारले, "जर तो इतका क्युट आहे, तर तुम्ही त्याला इथे माळी म्हणून का नाही ठेवत?" पण दिलीपने लगेच नकार दिला. तो म्हणाला, "नाही बाबा, मी फक्त मॅडमसाठीच काम करेन." यावर बाबा हसले आणि म्हणाले, "तिथे (फराहसोबत) जास्त पैसे मिळतात, इथे फक्त 'माळा' आहेत, पैसे जाऊ देऊ नकोस." यानंतर, फराहने दिलीपची थट्टा करत सांगितले, "या माणसाने इतके कर्ज घेतले आहे की मी अजूनही ते फेडत आहे." बाबा रामदेव यांनी दिलीपचे नाव विचारले आणि त्याचा अर्थही सांगितला. यावर फराह म्हणाली, "दिलीपचा अर्थ सम्राट आहे, पण तो अजिबात राजासारखा दिसत नाही, तो तर फक्त एक उंदीर आहे."
फराहचे वय ऐकून रामदेव बाबा म्हणाले...
नंतर बाबा रामदेव यांनी फराह आणि दिलीपची ओळख त्यांच्या गुरुंसोबत करून दिली. ते म्हणाले, "ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे, १०० कोटींहून अधिक लोक तिला ओळखतात. ही म्हातारी झाली आहे, ६० वर्षांची आहे, तरीही ४० वर्षांची दिसते." यावर फराहने उत्तर दिले की, जेव्हा तुम्ही तणाव घेत नाही, तेव्हा तरुण दिसता.
फराह खान कुक दिलीपला देते इतकी सॅलरी
फराह खानच्या कुकचे नाव दिलीप आहे आणि तो तिच्यासोबत ११ वर्षांपासून काम करत आहे. फराहने एकदा सांगितले होते की, जेव्हा त्याने काम सुरू केले, तेव्हा त्याचा पगार २०,००० रुपये होता. आता ती त्याचा सध्याचा पगार सांगू शकत नाही. फराहने दिलीपच्या मुलांना चांगल्या इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे आणि बिहारमध्ये त्याचे तीन मजली घर बांधायलाही मदत करत आहे.