उर्फी जावेदच्या आधार कार्डवरचा फोटो बघुन इंटरनेटवर धमाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:49 IST2022-11-23T16:48:23+5:302022-11-23T16:49:49+5:30
नेहमी विचित्र कपड्यांमध्ये दिसणारी उर्फी जावेद चा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला वाटेल यात काय नवीन आहे, तर हा उर्फी जावेद चा आधार कार्डवरचा फोटो आहे

उर्फी जावेदच्या आधार कार्डवरचा फोटो बघुन इंटरनेटवर धमाल !
नेहमी विचित्र कपड्यांमध्ये दिसणारी उर्फी जावेद चा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला वाटेल यात काय नवीन आहे, तर हा उर्फी जावेद चा आधार कार्डवरचा फोटो आहे जो नेटकऱ्यांनी शोधून काढलाय. हा फोटो पाहून युझर्सची हसुन हसुन पुरेवाट झाली आहे.
उर्फी जावेदचे लुक्स, तिची स्टाईल कायम चर्चेत असते. उगीच लक्ष वेधून घेण्यासाठी ती असे विचित्र कपडे घालते अशी टीकाही तिच्यावर केली जाते. मात्र तरीही एअरपोर्ट असो किंवा शुटचा सेट किंवा एखादी पार्टी उर्फीचे कपडे निराळेच असतात. याउलट तिचा आधार कार्डवरचा फोटो पाहून लोकही चक्रावले आहेत. ही उर्फीच आहे का असा प्रश्नच सर्वांना पडलाय.
आधार कार्डवरही उर्फीने जांभळ्या रंगाचा स्ट्रॅप टॉप घातलेला दिसतोय. म्हणजे या फोटोतही ती साध्या कपड्यात नाही हे स्पष्ट कळते. त्यामुळे उर्फीच्या कपड्यांची चर्चा होणं काही आता थांबत नाही.