रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:39 IST2022-09-22T15:39:03+5:302022-09-22T15:39:28+5:30

Richa Chaddha And Ali Fazal :बॉलिवूड कलाकार रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.

Have you seen the wedding card of Richa Chadha-Ali Fazal's wedding? It is going viral on social media. | रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

बॉलिवूड कलाकार रिचा चड्ढा (Richa Chaddha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. बऱ्याच दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे हे दोन्ही कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाबाबत अनेक बातम्या आल्या आहेत. आता या दोघांच्या लग्नाचे कार्डही समोर आले आहे जे खूपच वेगळं आणि युनिक आहे.

नुकतेच, रिचा आणि अलीच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे, जी पूर्णपणे वेगळ्या प्रकारची आहे. हे कार्ड पाहता ते रेट्रो थीमवर लग्न करणार आहेत असे दिसते. हे कार्ड माचिस बॉक्ससारखे दिसते. त्यात सायकलवर बसलेली रिचा आणि अलीचे स्केच असून वर 'कपल मॅचेस' असे लिहिले आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, रिचा आणि अली ४ ऑक्टोबरला लग्न करणार आहेत. हे लग्न दिल्लीच्या जिमखाना क्लबमध्ये होणार असून त्यानंतर दिल्लीतच मोठे रिसेप्शन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर हे कपल मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही ठेवण्याची शक्यता आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, रिचा चड्ढा सध्या तिच्या आगामी 'हिरामंडी' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, ज्याचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. अली फजलबद्दल सांगायचे तर तो त्याच्या 'मिर्झापूर' या सुपरहिट वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग करत आहे.

Web Title: Have you seen the wedding card of Richa Chadha-Ali Fazal's wedding? It is going viral on social media.