'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 15:48 IST2024-12-02T15:47:44+5:302024-12-02T15:48:25+5:30
Tamannah Bhatia : तमन्ना भाटिया 'स्त्री २'मध्ये 'आज की रात...' या गाण्यावर थिरकताना दिसली. हे गाणे खूप चर्चेत आले होते.

'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली...
अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamannah Bhatia)चा चित्रपट 'सिकंदर का मुकद्दर' २९ नोव्हेंबर रोजी OTT वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. याआधी ती स्त्री २ चित्रपटाच्या डान्स नंबरमध्ये दिसली होती. या चित्रपटात ती आज की रात या आयटम नंबरमध्ये डान्स करताना दिसली होती. या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली. तमन्नाच्या शैलीने आणि अदांनी चाहत्यांची मन जिंकली आहेत. याबाबत तमन्नाने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
तमन्ना भाटियाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, 'मला वाटते आज की रात... गाण्यामुळे या चित्रपटाच्या यशात माझा वाटा आहे. सुरुवातीला हे स्वीकारताना मला खूप त्रास होत होता. चित्रपटाच्या यशाशी या गाण्याच्या संबंधाबाबत तमन्ना म्हणाली की 'मला या गाण्यामुळे खूप प्रेम मिळाले आहे. मी आणखी काय क्रेडिट मागू शकेन?
'स्त्री २' सिनेमाबद्दल
'स्त्री २' बद्दल बोलायचे झाले तर अमर कौशिकने याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी असे स्टार्स दिसले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि करोडोंची कमाई केली.
या चित्रपटात दिसणार तमन्ना
'स्त्री २' व्यतिरिक्त तमन्ना वेदा या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने खास भूमिका साकारली होती. आता ती ओडेला २ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. ती शिवा शक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. वैयक्तिक आयुष्यात तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे.