"माझ्या वडिलांचे ५-६ रिलेशनशिप होते...", हर्षवर्धन राणेचा खुलासा; रोमँटिक भूमिकांबद्दल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:10 IST2025-10-24T17:09:33+5:302025-10-24T17:10:24+5:30
रोमँटिक भूमिकांबद्दल बोलताना हर्षवर्धन राणेने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या, म्हणाला, "वडिलांच्या..."

"माझ्या वडिलांचे ५-६ रिलेशनशिप होते...", हर्षवर्धन राणेचा खुलासा; रोमँटिक भूमिकांबद्दल म्हणाला...
'सनम तेरी कसम' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता हर्षवर्धन राणे. मधल्या काळात तो त्याच्या परीक्षेमुळे चर्चेत होता. हर्षवर्धन मानसशास्त्राचं शिक्षण घेत आहे. मध्यंतरी त्याचे कॉलेजमध्ये पेपर लिहितानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता तो 'एक दीवाने की दीवानीयत' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात हर्षवर्धनचा सोनम बाजवासोबत रोमान्स आहे. सोशल मीडियावर सिनेमाची चर्चा आहे. सोबतच नुकतंच हर्षवर्धनने त्याच्या वडिलांबाबतीत एक खुलासा केला आहे. वडिलांना ५-६ मुलींसोबत पाहिल्याचं तो म्हणाला.
रोमँटिक भूमिकांबद्दल बोलताना हर्षवर्धन राणेने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या. अशा भूमिका करणं आपण आपल्या वडिलांच्या ५-६ रिलेशनशिपमधून शिकलो आहे असं हर्षवर्धन राणेने सांगितलं. तो म्हणाला, "मी माझ्या वडिलांना वेगवेगळ्या वेळी ५-६ पार्टनरसोबत पाहिलं आहे. मी गुपचूप त्यांना पाहायचो. त्यांचं प्रेम, इमोशनल कनेक्ट आणि नात्यांची ओढ समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. लहानपणी मी त्यांच्या भावनांना त्यांना ऑकवर्ड न वाटू न देता त्यांना समजून घ्यायचो."
यानंतर हर्षवर्धनने कोस्टार सोनम बाजवाचंही कौतुक केलं. तो म्हणाला, "सोनम माझी आतापर्यंतची सर्वात शानदार सहकलाकार आहे. तिच्यात खूप टॅलेंट आहे जे अजून पूर्णपणे जहासमोर आलेलं नाही. ती एक सच्ची कलाकार आहे, संवेदनशील आहे. ती फक्त कमर्शियल हिरोईन नाही तर अशी अभिनेत्री आहे जी आपलस्या डोळ्यांनी आणि मौनातूनही अभिनय जिवंत करु शकते. जेव्हा ती एखाद्या भूमिकेत असते तेव्हा ती स्वत:ला पूर्णपणे झोकून देते. मला वाटतं इंडस्ट्रीने अद्याप तिचं टॅलेंट ओळखलेलं नाही."