हॅरी पॉटरने 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घेतला सेल्फी, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर झाली अचानक भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:26 AM2023-12-14T10:26:09+5:302023-12-14T10:27:14+5:30

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना अभिनेत्रीची भेट चक्क 'हॅरी पॉटर' फेम हॉलिवूड अभिनेता डॅनियल रॅडक्लिफसोबत झाली आहे.

Harry Potter took a selfie with actress Mrunal Thakur shared fan girl moment on instagram | हॅरी पॉटरने 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घेतला सेल्फी, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर झाली अचानक भेट

हॅरी पॉटरने 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घेतला सेल्फी, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर झाली अचानक भेट

धुळ्याची मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या बॉलिवूड आणि साऊथमध्येही अभिनयाचा डंका गाजवत आहे. 'सीतारामम' सिनेमामुळे मृणालचा चाहतावर्ग वाढला आहे. सिनेमातील तिच्या सौंदर्याने अक्षरश: चाहत्यांना वेड लावलंय. मृणाल सध्या तिचा तेलुगू सिनेमा 'हाय नॅना'च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना मृणालची भेट चक्क हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेता डॅनियल रॅडक्लिफसोबत (Daniel Radcliffe) झाली आहे. मृणालने ही फॅन मोमेंट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकूरने इन्स्टाग्रामवर न्यूयॉर्कच्या काही स्टोरीज शेअर केल्या. यामध्ये तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ती हॅरी पॉटरला पाहून खूश झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये भर गर्दीत हॅरी पॉटर मास्क लावून चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मृणालने हा व्हिडिओ शूट केला असून मागून ती 'आय लव्ह यू डॅनियल' असंही म्हणत आहे. यावर डॅनियलही तिला 'थँक्यू व्हेरी मच' अशी प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओनंतर मृणालने डॅनियलसोबतचा सेल्फीही शेअर केला आहे. स्वत: हॅरी पॉटरनेच हा सेल्फी काढला आहे. यामध्ये मृणालसोबत तिची मेकअप आर्टिस्टही आहे.



हॅरी पॉटरचे सीरिज पाहिली नाही असं क्वचितच कोणी असेल. त्यात मृणालला चक्क हॅरी पॉटरसोबत सेल्फी घेण्याची संधी मिळाल्याने हा तिच्यासाठी खास क्षण होता. मृणाल सध्या 'हाय नॅना' चं प्रमोशन करत आहे. हा एक फॅमिली ड्रामा आहे. अभिनेता नानीसोबत मृणाल झळकली आहे. सिनेमा तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

 

मृणालचा टीव्ही ते सिनेमा असा प्रवास राहिला आहे. 'कुमकुम भाग्य' या मालिकेतून मृणालला ओळख मिळाली. तिने 'विटी दांडू' या मराठी सिनेमातही काम केले आहे. लवकरच ती विजय देवरकोंडासोबत 'VD13' सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Harry Potter took a selfie with actress Mrunal Thakur shared fan girl moment on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.