"दोनदा गर्भपात झाला अन् त्यामुळे...", हरभजन सिंगची पत्नी गीता बसराने सांगितला वाईट प्रसंग, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 10:50 IST2025-09-20T10:48:44+5:302025-09-20T10:50:45+5:30

हरभजन सिंगची पत्नी गीता बसराने सांगितला कठीण काळ; म्हणाली-"मुल गमावणं..."

harbhajan singh wife actress geeta basra open up about her two miscarriage says | "दोनदा गर्भपात झाला अन् त्यामुळे...", हरभजन सिंगची पत्नी गीता बसराने सांगितला वाईट प्रसंग, म्हणाली...

"दोनदा गर्भपात झाला अन् त्यामुळे...", हरभजन सिंगची पत्नी गीता बसराने सांगितला वाईट प्रसंग, म्हणाली...

Geeta Barsa: भारताचा माजी ऑफस्पिन गोलंदाज हरभरजन सिंगची पत्नी गीता बसरा ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २००६ साली दिल दिया है चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली. सध्या ही अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'मेहर'मुळे चर्चेत आली आहे.या चित्रपटाद्वारे तब्बल ६ वर्षांच्या ब्रेकनंतर ती अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. एकीकाळी करिअर प्रसिद्धीच्या शिखरावर असताना गीताने हरभजन सिंगसोबत लग्न करून अभिनयातून ब्रेक घेतला. त्यानंतर २०२६ मध्ये त्यांची मुलगी हिनायाचा जन्म झाला. त्यानंतर या जोडप्याला एक मुलगा झाला आणि त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. मात्र, त्यापूर्वी गीता बरसाचा दोन वेळा गर्भपात झाला होता. अलिकडेच तिने त्या वाईट प्रसंगावर भाष्य केलं आहे. 

अलिकडेच गीता बसराने 'हॉटरफ्लाय'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी उघडपणे सांगितलं. मुलीच्या जन्मानंतर तिचा दोन वेळा गर्भपात झाला होता.त्या कठीण काळाविषयी सांगताना गीता बसरा म्हणाली," मी दोनदा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा गर्भपात झाला. हा माझ्या आयुष्यातील कठीण काळ होता.मी अगदी तंदुरुस्त होते,योगा करत होते. शिवाय खाण्याकडेही योग्य लक्ष दिलं होतं. मग काय चूक असू शकते. माझा गर्भपात का झाला हेच मला कळालं नाही."

यापुढे अभिनेत्री म्हणाली," पण अशी गोष्ट माझ्यासोबत घडल्यानंतर  मला खूप धक्का बसला. असं काही घडेल हे मला अपेक्षितच नव्हतं. कारण हिनाच्यावेळी सगळं ठीक होतं, असं काही घडलं नाही. त्यानंतर तीन वर्षांनी मी पुन्हा गरोदर राहिले आणि गर्भपात झाला. ते मला अपेक्षित नव्हतं. त्याचबरोबर या मुलाखतीत गीता असंही म्हणाली की, "मुलं गमावणं खूप कठीण असतं.कारण यासाठी तुमचं मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असतं."

हरभजन सिंगबद्दल गीता काय म्हणाली?

या मुलाखतीत पती हरभजन सिंगबद्दल म्हणाली,"जेव्हा माझा पहिल्यांदा गर्भपात झाला त्यावेळी ते पंजाबमध्ये होते. त्याला जसं माझ्याबद्दल समजलं तसाच तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आला. माझं एक छोटसं ऑपरेशन होणार होतं. त्याकाळातही तो माझ्यासोबत होता." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या. 

Web Title: harbhajan singh wife actress geeta basra open up about her two miscarriage says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.