Happy Birthday Kartik Aaryan : ज्या घरात भाड्याने राहत होता, आज त्याच घराचा मालक आहे कार्तिक आर्यन; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:32 IST2021-11-22T16:30:54+5:302021-11-22T16:32:22+5:30
Happy Birthday Kartik Aaryan : कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या घराची सैर करू. कार्तिक मुंबईतील वर्सोवाच्या लॅविश अपार्टमेंटमध्ये राहतो.

Happy Birthday Kartik Aaryan : ज्या घरात भाड्याने राहत होता, आज त्याच घराचा मालक आहे कार्तिक आर्यन; जाणून घ्या किंमत
ग्वाल्हेरहून हिरो होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) आता मुंबईत बराच काळ झाला आहे. कार्तिकचा एकंदर ग्राफ बघता त्याने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला असंच दिसतं. त्याने आपल्या कामाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. हेच कारण आहे की, त्याच्याकडे आता सिनेमांची मोठी लाइन लागली आहे.
कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या घराची सैर करू. कार्तिक मुंबईतील वर्सोवाच्या लॅविश अपार्टमेंटमध्ये राहतो. लॉकडाऊन दरम्यान कार्तिकने अनेकदा त्याच्या फॅन्स त्याच्या घराची झलक दाखवली आहे. त्याच्या फोटोज किंवा व्हिडीओत त्याचं घर दिसतंच.
जर त्याचे फोटो लक्ष देऊन पाहिले तर कार्तिकने आपल्या घराचं डेकॉर साधंच ठेवलं आहे. त्याचं बेडरूम ब्लू आणि पांढऱ्या रंगाने सजलं आहे. तेच या रूममध्ये एक स्टडी टेबल आहे. या खोलीत एक खिडकी आहे जिथून शहराचा नजारा दिसतो.
रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आपल्या स्ट्रगलच्या दिवसात याच घरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. पुढे जाऊन कार्तिकने हे घर १.६० कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. ही प्रॉपर्टी राजकिरण हाउसिंग सोसायटीमध्ये आहे. जी यारी रोडवर आहे. ही प्रॉपर्टी ४५९ स्क्वेअर फूट आहे. हे घर इमारतीच्या पाचव्या फ्लोरवर आहे.