Happy Birthday Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचे गाजलेले डायलॉग ऐकून होऊ या पुन्हा नॉस्टॅलजिक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 11:12 IST2018-10-11T11:10:57+5:302018-10-11T11:12:25+5:30
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६वा वाढदिवस ते साजरा करत आहे. इतक्या वर्षांनंतही त्यांची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.

Happy Birthday Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचे गाजलेले डायलॉग ऐकून होऊ या पुन्हा नॉस्टॅलजिक!
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६वा वाढदिवस ते साजरा करत आहे. इतक्या वर्षांनंतही त्यांची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. अमिताभ बच्चन यांची अॅंग्री यंग मॅन ही इमेज जरी सर्वात लोकप्रिय असली तरी ते एक ऑलराऊंडर अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांचा फॅन नसणारा व्यक्ती क्वचितच सापडेल. त्यांच्या भूमिकांसोबतच त्यांचे डायलॉग आजही सहज बोलण्यात अनेकजण वापरताना दिसतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही सदाबहार डायलॉगने पुन्हा एकदा नॉस्टॅलजिक अनुभव घेऊया...
'दिवार' हा त्यांच्या सर्वात जागलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा. या सिनेमातील जवळपास सर्वच डायलॉग सुपरहिट आहेत.
अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज ही त्यांची सर्वात चांगली खासियत आहे. त्यांची आवाजाची खरी जादू ही 'अग्निपथ' या सिनेमात बघायला मिळाली होती. एका वेगळ्याच शैलीत त्यांनी या सिनेमात डायलॉग डिलेवरी केली. त्यामुळे हे डायलॉग आणखीन गाजले.
'शराबी' हा सिनेमा सुद्धा त्यांच्या अफलातून अदाकारीसाठी ओळखला जातो. एक श्रीमंत २४ तास दारु पिणारा तरुण त्यांनी यात साकारला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारूच्या थेंबालाही हात न लावणारे अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात नशेत असण्याची कमालीची अदाकारी केली आहे.
'जंजीर' या सिनेमाने खऱ्या अर्थाने बॉलिवूडला हा महानायक दिला. याच सिनेमाने अमिताभ बच्चन ते महानायक ही मुहूर्तमेढ रोवली गेली होती.
'अग्निपथ' हा सिनेमा त्यावेळी फ्लॉप झाला होता. पण नंतर या सिनेमाला चांगलीच पसंती मिळाली. याच सिनेमातील कांचा चीना आणि विजय चौहानची भेट होणारा सीन अनेकांच्या आजही स्मरणात असेल.
'शोले' हा सुद्धा अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वात खास सिनेमा आहे. या सिनेमात तसं त्यांच्या वाट्याला फार कमी बोलणं आलं. पण एका सीन फारच गाजला होता. त्यात अमिताभ बच्चन यांनी चांगलीच धमाल केली.
'डॉन' सिनेमाची क्रेज आजही बघायला मिळते. पूर्णपणे मनोरंजन करणारा हा एक अफलातून सिनेमा आहे. या सिनेमातीलही त्यांचे सर्वच डायलॉग लोकप्रिय आहेत.