Happy Birthday Abram : शाहरुखच्या लाडक्या लेकानं 'या' चित्रपटातून केलाय बॉलिवूड डेब्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:25 AM2024-05-27T10:25:56+5:302024-05-27T10:26:33+5:30

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान नेहमीच चर्चेत

Happy Birthday Abram Khan : Shahrukh khan younger son Happy Birthday Abram Khan debut movie unknown facts | Happy Birthday Abram : शाहरुखच्या लाडक्या लेकानं 'या' चित्रपटातून केलाय बॉलिवूड डेब्यू!

Happy Birthday Abram : शाहरुखच्या लाडक्या लेकानं 'या' चित्रपटातून केलाय बॉलिवूड डेब्यू!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. कधी केकेआर टीमसाठी तर कधी त्याच्या चित्रपटांसाठी. सोशल मीडियावर त्याचे नाव कायम चर्चेत असतं. शाहरुखची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन खान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आर्यन आणि सुहानाच्या आधी शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

शाहरुखसोबत एका चित्रपटात अबराम डान्स करताना दिसला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. 27 मे 2013 रोजी अबराम खानचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. तुम्हाला माहित असेल की अबराम खान जेव्हा 1 वर्षाचा होता, तेव्हा तो 'हॅप्पी न्यू इयर' या चित्रपटात दिसला होता.  चित्रपटाच्या शेवटी फराह खान जेव्हा तिच्या टीमची ओळख करून देते, तेव्हा त्यात अबराम खानला  दाखवण्यात आलं आहे.

2014 साली प्रदर्शित झालेलेा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता. तर गौरी खानने सिनेमाची निर्मिती केली होती. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, विवान शाह, बोमन इराणी आणि जॅकी श्रॉफ सारखे कलाकार दिसले होते. Sacnilk च्या मते, 'हॅपी न्यू इयर'  चित्रपटाचे बजेट 150 कोटी रुपये होते तर चित्रपटाने जगभरात 397 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

Web Title: Happy Birthday Abram Khan : Shahrukh khan younger son Happy Birthday Abram Khan debut movie unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.