हंसिकाने खास पद्धतीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस; शेअर केला लग्नाचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 15:14 IST2023-12-04T15:12:18+5:302023-12-04T15:14:46+5:30

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरियाने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Hansika Motwani, Sohael celebrate 1st wedding anniversary | हंसिकाने खास पद्धतीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस; शेअर केला लग्नाचा व्हिडीओ

हंसिकाने खास पद्धतीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस; शेअर केला लग्नाचा व्हिडीओ

गेल्या वर्षी अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. एक-एक करून आपण या सर्व सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले. नुकतेच हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरियाने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. याचे काही खास फोटो हंसिका मोटवानीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. 

बॉलिवूड आणि साउथमध्ये बालकलाकार म्हणून अभिनय सुरू केलेल्या हंसिका मोटवानीने तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यासोबतच तिने लग्नाचा व्हिडीओही शेअर केला आहे.  हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी फर्स्ट अ‍ॅनिव्हर्सरी बेब. हे वर्ष आशीर्वादासारखं राहिलं. तुझ्याशी लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय. मी तुझ्यावर खूप प्रेम करते'.

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचा 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरच्या 450 वर्ष जुन्या मुंडोता फोर्ट अँड पॅलेसमध्ये शाही विवाह पार पडला होता. लाल लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती.   हंसिकाचं जरी हे पहिलं लग्न असलं तरी सोहेलचं दुसरं लग्न आहे. याआधी रिंकी नावाच्या मुलीशी सोहेलचं लग्न झालं होतं. रिंकी हंसिकाचीही मैत्रीण आहे. हंसिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तिने एम. राजेश दिग्दर्शित MY3 या वेब सीरिजमधून ओटीटी पदार्पण केले. 

Web Title: Hansika Motwani, Sohael celebrate 1st wedding anniversary