Hansika Motwani : एक क्षण प्रेमाचा..., थेट आयफेल टॉवरसमोर बॉयफ्रेन्डने हंसिका मोटवानीला केलं प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 14:50 IST2022-11-02T14:49:50+5:302022-11-02T14:50:12+5:30
Hansika Motwani : ‘Now&Forever’असं कॅप्शन देत हंसिकाने या रोमॅन्टिक क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Hansika Motwani : एक क्षण प्रेमाचा..., थेट आयफेल टॉवरसमोर बॉयफ्रेन्डने हंसिका मोटवानीला केलं प्रपोज
दिवाळीनंतर लग्नाचा धडाका सुरू होणार आहे आणि बॉलिवूड व साऊथची एक अभिनेत्रीही लग्नबंधनात अडकणार आहे. होय, अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) लवकर लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. पण प्रपोजलचे रोमॅन्टिक फोटो मात्र समोर आले आहेत.
हंसिका बिझनेसमॅन सोहेल कथुरियाबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. पण त्याआधी सोहेलने हंसिकाला लग्नासाठी प्रपोज केलं. ते सुद्धा थेट आयफेल टॉवरसमोर. ‘Now&Forever’असं कॅप्शन देत हंसिकाने या रोमॅन्टिक क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सोहेल ब्लॅक सूटमध्ये दिसतोय, तर हंसिकाने स्ट्रॅपलेस पांढरा ड्रेस परिधान केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार हंसिका आणि सोहेल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. पण अद्याप हंसिकाने लग्नाच्या तारखेबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही.
‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेतून हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. क्योंकी सास भी कभी बहू थी, सोनपरी, करिश्मा का करिश्मा अशा अनेक टीव्ही मालिकेत हंसिका झळकली. अनेक मालिकांमध्य काम केल्यानंतर हंसिकाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. त्यावेळी तिचं वय होतं 15 वर्षे.
2007 साली हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ या सिनेमात हंसिका झळकली आणि तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण काय तर त्यावेळी हंसिकाचं वय होतं केवळ 16 वर्षे आणि चित्रपटात ती वयापेक्षा कितीतरी मोठी दिसली होती. त्याआधी 2003 मध्ये ‘कोई मिल गया’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून दिसली होती आणि चारच वर्षांनी ‘आपका सुरूर’मध्ये ती लीड हिरोईन होती. ‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून सर्वच हैराण झाले होते. यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. लवकर मोठं होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचं याकाळात बोललं गेलं होतं.