Hansika Motwani आणि Sohail kathuriaच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले अभिनेत्रीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:25 PM2022-11-23T15:25:57+5:302022-11-23T15:27:27+5:30

Hansika Motwani: हंसिका मोटवानी सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून हंसिकाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Hansika Motwani and Sohail kathuria wedding rituals started | Hansika Motwani आणि Sohail kathuriaच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले अभिनेत्रीचे फोटो

Hansika Motwani आणि Sohail kathuriaच्या लग्नाच्या विधी सुरु, समोर आले अभिनेत्रीचे फोटो

googlenewsNext

टीव्ही ते टॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani)च्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. हंसिका मोटवानी ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. . त्यासाठी जयपूरचा एक राजेशाही पॅलेसही बुक करण्यात आला आहे.

 हंसिका मोटवानी सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून हंसिकाच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नाच्या आधीचा पहिला कार्यक्रम माता की चौकी मुंबईत होते आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आलं आहेत. माता की चौकी फंक्शन दरम्यान हंसिका मोटवानी रेड कलरच्या सुंदर साडीमध्ये दिसली.

हंसिका मोटवानी ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विवाहसोहळा 2 डिसेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल ज्यामध्ये फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र जयपूरला जातील. रिपोर्टनुसार, 4 डिसेंबरच्या संध्याकाळी फेरे होतील, तर त्याच दिवशी सकाळी हळद समारंभ होईल. 2 डिसेंबरला सुफी रात्री, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदी, संगीत होईल.

‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेतून हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर ती चित्रपटांकडे वळली.  क्योंकी सास भी कभी बहू थी, सोनपरी, करिश्मा का करिश्मा अशा अनेक टीव्ही मालिकेत हंसिका झळकली. अनेक मालिकांमध्य काम केल्यानंतर हंसिकाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. त्यावेळी तिचं वय होतं 15 वर्षे. 

2007 साली हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ या सिनेमात हंसिका झळकली आणि तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. कारण काय तर त्यावेळी हंसिकाचं वय होतं केवळ 16 वर्षे आणि चित्रपटात ती वयापेक्षा कितीतरी मोठी दिसली होती. त्याआधी 2003 मध्ये ‘कोई मिल गया’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून दिसली होती आणि चारच वर्षांनी ‘आपका सुरूर’मध्ये ती लीड हिरोईन होती. ‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून सर्वच हैराण झाले होते.  यावरून  वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. लवकर मोठं होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचं याकाळात बोललं गेलं होतं.  
 

Web Title: Hansika Motwani and Sohail kathuria wedding rituals started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.