Bollywood : खरंच चाहते असाल तर फोटोतील लाडक्या अभिनेत्याला ओळखून दाखवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:32 IST2022-12-30T17:32:05+5:302022-12-30T17:32:53+5:30
सोशल मीडियावर सेलिब्रिटी आपले लहानपणीचे फोटो अपलोड करत असतात. अनेकदा आपल्या आवडत्या कलाकरांना ओळखणेही कठीण होते.

Bollywood : खरंच चाहते असाल तर फोटोतील लाडक्या अभिनेत्याला ओळखून दाखवा !
सोशल मीडियावर सेलिब्रिटी आपले लहानपणीचे फोटो अपलोड करत असतात. अनेकदा आपल्या आवडत्या कलाकरांना ओळखणेही कठीण होते. काही जणांचे ब्लॅक अॅँड व्हाईट फोटो तर ओळखूच येत नाहीत. असाच एका बॉलिवुड सुपरस्टारचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुम्ही खरंच त्याचे फॅन असाल तर ओळखून दाखवा.
या फोटोत दोन लहान मुले उभी आहेत. त्यातला एक बॉलिवुडचा मोठा सुपरस्टार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. एवढंच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. फोटोतील दोन्ही मुलं भावंडं आहेत. एक हिंट द्यायची झाली तर हे खान बंधू आहेत.
तर हा फोटो आहे बॉलिवुडचा दबंग अभिनेता सलमान खानचा (Sakman Khan). हा त्याचा बालपणीचा फोटो आहे तर त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ सोहेल खान दिसत आहे. आपल्या लाडक्या भाईजानला किती जणांना ओळखता आले ?
अभिनेता लमान खानच्या नवीन चित्रपटासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. सलमान खानची टायगर ३ हा सिनेमा यावर्षी रिलीज होत आहे. तर शाहरुखच्या पठाण सिनेमात सलमानचा कॅमिओ आहे. शाहरुख सलमानला एकत्र पाहायला तर चाहते आतुर आहेत.