अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! 'धुरंधर' अभिनेत्याने दिली सर्वांना गुड न्यूज, काय घडलंय खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:02 IST2026-03-30T14:59:44+5:302026-03-30T15:02:20+5:30

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि 'धुरंधर' चित्रपटातून सर्वांची मने जिंकणारा अक्षय खन्ना सध्या त्याच्या करिअरमध्ये शिखरावर आहे

good news for Akshaye Khanna his mahakali telugu movie now in hindi | अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! 'धुरंधर' अभिनेत्याने दिली सर्वांना गुड न्यूज, काय घडलंय खास?

अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! 'धुरंधर' अभिनेत्याने दिली सर्वांना गुड न्यूज, काय घडलंय खास?

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि 'धुरंधर' चित्रपटातून सर्वांची मने जिंकणारा अक्षय खन्ना सध्या त्याच्या करिअरमध्ये शिखरावर आहे. 'धुरंधर'मधील त्याच्या दमदार भूमिकेनंतर अक्षयची लोकप्रियता प्रचंड वाढली असून, आता त्याने साउथ सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला आहे. अक्षय खन्ना लवकरच 'महाकाली' (Mahakali) या चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. याविषयी अक्षयने सर्वांना गुड न्यूज दिली आहे. 

'धुरंधर'मधील लोकप्रियतेचा फायदा

'धुरंधर' चित्रपट आणि त्यातील अक्षय खन्नाच्या कामाचे देशभरात कौतुक झाले. या चित्रपटामुळे अक्षयला एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली. याच लोकप्रियतेचा विचार करून दाक्षिणात्य निर्मात्यांनी अक्षयला 'महाकाली'साठी कास्ट केले. हा चित्रपट आधी फक्त तेलुगु भाषेत रिलीज होणार होता. त्यामुळे अक्षयच्या हिंदी भाषिक चाहत्यांची मोठी निराशा झाली होती. परंतु आता हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होण्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.

अक्षय खन्नाचा मोठा चाहता वर्ग हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये आहे, हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी 'महाकाली' चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'धुरंधर'नंतर आता अक्षय खन्नाचा हा साउथ सिनेमा हिंदी भाषेतही येत असल्याने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहचेल यात शंका नाही.


कसा असेल अक्षयचा लूक?

मिळालेल्या माहितीनुसार, 'महाकाली' मध्ये अक्षय खन्नाचा लूक आणि त्याची भूमिका अतिशय वेगळी असणार आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना असुरगुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून, यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील इतरही दिग्गज कलाकार दिसणार आहेत. सर्वांना 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाला या पौराणिक भूमिकेत पाहण्याचं कुतुहल आहे.

Web Title : अक्षय खन्ना का साउथ डेब्यू: 'महाकाली' अब हिंदी में भी!

Web Summary : 'धुरंधर' से मशहूर अक्षय खन्ना 'महाकाली' में असुरगुरु शुक्राचार्य के रूप में तेलुगु सिनेमा में डेब्यू कर रहे हैं। पहले केवल तेलुगु में, अक्षय के हिंदी भाषी प्रशंसकों के कारण अब फिल्म हिंदी में भी रिलीज़ होगी। इससे व्यापक दर्शक तक पहुंचने की उम्मीद है।

Web Title : Akshay Khanna's South Debut: 'Mahakali' to Release in Hindi!

Web Summary : Akshay Khanna, famed for 'Dhurandhar,' is debuting in Telugu cinema with 'Mahakali' as Asuraguru Shukracharya. Initially Telugu-only, producers will now release the film in Hindi due to Akshay's large Hindi-speaking fanbase. This expansion promises to reach a wider audience.