१० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:51 IST2025-06-17T11:50:42+5:302025-06-17T11:51:12+5:30

जिनिलिया म्हणाली, "मी १० तास काम करते..."

genelia dsouza talks about actors working hours and overtime disagrees with deepika padukone | १० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत

१० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत

बॉलिवूडमध्ये कामाच्या शिफ्टवरुन चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) 'स्पिरीट' सिनेमासाठी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासमोर ८ तासांच्या शिफ्टची अट ठेवली. तसंच २० कोटी मानधन आणि प्रॉफिट शेअरचीही मागणी केली. या मागण्या नाकारत वांगा यांनी दीपिकाला सिनेमातूनच बाहेर काढलं. दीपिकाला इंडस्ट्रीतून अनेकांनी पाठिंबा दिला. मात्र नुकतंच जिनिलियाने (Genelia Dsouza) या विषयावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जिनिलिया देशमुख आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. वर्क लाईफ बॅलन्सबद्दल ती म्हणाली, "हे अवघड आहे पण अशक्य नाही. मी १० तास काम करते. काही वेळा दिग्दर्शक ११-१२ तासही शिफ्ट खेचतात. हे योग्यही आहे आपण फक्त त्याप्रमाणे आपलं शेड्युल अॅडजस्ट केलं पाहिजे. एखादा दिवस किंवा दोन दिवस तुम्हाला ओव्हरटाईम करावं लागणं हे समजूच शकतो. ही एक प्रक्रिया आहे जी पूर्ण करावीच लागते."

दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोल, अभिनेता अजय देवगण, दिग्दर्शक कबीर खान यांनी दीपिकाच्या बाजूने प्रतिक्रिया दिली होती. आमिर-अक्षयही ८ तासच काम करतात असं कबीर खान म्हणाले होते. तर अभिनेत्रींच्या ८ तासांच्या शिफ्टवर प्रामाणिक फिल्ममेकर्सना काही अडचण नसावी असं अजय देवगण म्हणाला होता.

संदीप रेड्डी वांगा यांनी 'स्पिरिट'मधून दीपिकाला बाहेर काढलं आणि अभिनेत्री तृप्ती डिमरीची निवड केली. तृप्ती या सिनेमासाठी ४ कोटी मानधन घेणार आहे. प्रभाससोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर दीपिका अ‍ॅटलीच्या सिनेमात दिसणार आहे.

Web Title: genelia dsouza talks about actors working hours and overtime disagrees with deepika padukone