जेनेलिया देशमुखची मुलांसाठी खास पोस्ट; लाडक्या मुलांसाठी लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 18:34 IST2023-09-04T18:30:14+5:302023-09-04T18:34:27+5:30

जिनिलिया देशमुखने मुलांसाठी खास पत्र लिहिलं.

Genelia Deshmukh special post for kids | जेनेलिया देशमुखची मुलांसाठी खास पोस्ट; लाडक्या मुलांसाठी लिहिलं पत्र

Genelia Deshmukh

रितेश-जिनिलिया हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. पण यासोबत हे दोघे आदर्श पालक आहेत. कायमच आपल्या मुलांना मातीशी जोडून ठेवण्याचा या दोघांचा प्रयत्न असतो. मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवताना ते अनेकदा दिसून आले आहेत. पण, जेव्हा कामाच्या व्यापामुळे जिनिलियाला मुलांना वेळ द्यायला जमतं नाही, तेव्हा ती मुलांसाठी काय करते, याबद्दल खुद्द जिनिलियाने पोस्ट करुन सांगितले आहे.  

जिनिलियाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिने मुलांच्या जेवणाच्या डब्ब्यात पत्र ठेवल्याचे दिसतं आहे. या पत्रात तिने लिहलं की, “माय डिअर बेबी बॉय! मला तुझी खूप आठवण येते आहे. हे नेहमी लक्षात ठेव,  दयाळू आणि कणखर राहा…आय लव्ह यू, तुझीच आई” ही छोटीशी पत्र जिनिलीयाने दोन्ही मुलांच्या जेवणाच्या डब्यात ठेवली आहेत. शिवाय सोबतच एक छानसं गुलाबाचं फूल ठेवलं आहे. दोन्ही मुलांच्या पत्रात सारखाच संदेश लिहिला आहे.

 

"मला कामामुळे जेव्हा मुलांना वेळ देता येत नाही. तेव्हा माझ्या मनात अपराधी भावना असते. आशावेळी मी माझ्या मुलांच्या डब्यात अशी लहानशी पत्र ठेवते", असं कॅप्शन जिनिलियाने या फोटोला दिलं आहे. 

जिनिलिया आणि रितेशला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत.  मुलांचं मीडियामध्ये नेहमीच कौतुक होत असतं. दोघेही मुलांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. जेनिलिया ख्रिश्चन असली तरी आपल्या मुलांबरोबर ती मराठीतच बोलते. रितेशच्या घरात मराठी भाषेतच एकमेकांशी संवाद साधला जातो आणि हेच संस्कार त्यांच्या मुलांवरही आहेत.

Web Title: Genelia Deshmukh special post for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.