हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:36 IST2025-05-20T10:33:08+5:302025-05-20T10:36:55+5:30

जिनिलियाला नवऱ्याचं कौतुक, रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली

Genelia Deshmukh Emotional As Fans Shower Love On Ritesh Deshmukh Viral Video | हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया

हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया

Ritesh Deshmukh Genelia Video: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. पण त्याचं खरे यश हे त्याच्या नम्र स्वभावात आणि लोकांशी जोडलेलं मनापासूनच्या नात्यात आहे. हे दोघेही कायम चाहत्यांसोबत प्रेमानं वागताना दिसून येतात. त्यामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता या जोडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

रितेश आणि जिनिलिया एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दिसले की चाहत्यांचा त्यांच्या भोवती सेल्फीसाठी गरडा पडतो. आताही असचं झालं. नुकतंच एका ठिकाणी जिनिलिया आणि रितेश स्पॉट झाले. यावेळी एक खास क्षण पाहायला मिळाला. रितेशला पाहताच चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडा घातला. चाहत्यांच्या गर्दीत हरवलेल्या रितेशला पाहून मात्र जिनिलिया भारावली होती.  तिच्या चेहऱ्यावर नवऱ्याचं कौतुक आणि अभिमान दोन्ही झळकला आहे. याचा एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात आणि कपल गोल्स देतात. त्यांनी शेअर केलेल्या  व्हिडीओंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. या प्रेमळ जोडीची पहिली भेट २००३ मध्ये आलेल्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघांनी जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केले आणि ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नगाठ बांधली होती. 

Web Title: Genelia Deshmukh Emotional As Fans Shower Love On Ritesh Deshmukh Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.