'तुला माझ्यासोबत राहायचंय की...'; जेनेलियाच्या 'गुगली'वर रितेशची 'विकेट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:09 IST2023-08-09T15:07:44+5:302023-08-09T15:09:34+5:30
Riteish deshmukh: जेनेलियाने विचारलेल्या प्रश्नामुळे रितेशही काही काळासाठी सुन्न झाला होता.

'तुला माझ्यासोबत राहायचंय की...'; जेनेलियाच्या 'गुगली'वर रितेशची 'विकेट'
बॉलिवूडमधलं क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (genelia deshmukh). आज महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणूनही या दोघांकडे पाहिलं जाते. रितेश आणि जेनेलिया यांच्या लग्नाला जवळपास १० ते १२ वर्ष उलटून गेले आहेत. मात्र, त्यांच्यातील प्रेम अजून तितकीच छान खुलत आहे. अनेकदा या जोडीचं आदर्श जोडपं म्हणून उदाहरणदेखील देण्यात येतं. परंतु, यावेळी ही जोडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. जेनेलियाने लग्नानंतर रितेशला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे तो काही काळासाठी सुन्न झाला.
रितेश आणि जेनेलिया कलाविश्वासह सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय आहेत. त्यामुळे कायम ते नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात. यात काही मजेशीर रिल्स सुद्धा ते शेअर करतात. यावेळीदेखील त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ''मला ना तुझ्यासोबत कायम असंच आनंदात रहायचंय'', असं रितेश म्हणतो. त्यावर, ''तू आधी ठरव तुला माझ्यासोबत रहायचंय की आनंदात रहायंच'', असं जनेलिया म्हणते. त्यावर रितेश एकदम मजेशीर एक्स्प्रेशन्स देतो. हा व्हिडीओ शेअर करत रितेशने 'बायको = खुशी' असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेसुद्धा कमेंट केली आहे.