उफ्फ! ‘गहराइयां’चं पहिलं गाणं ‘डुबे’ रिलीज; कधीही पाहिलं नसेल दीपिकाचं इतकं बोल्ड रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:33 IST2022-01-24T17:31:48+5:302022-01-24T17:33:25+5:30

Gehraiyaan song Doobey:  ‘गहराइयां’ या सिनेमात दीपिकाने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदा दीपिका  इतक्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे.

Gehraiyaan song Doobey: Deepika Padukone and Siddhant Chaturvedi movie Gehraiyaan | उफ्फ! ‘गहराइयां’चं पहिलं गाणं ‘डुबे’ रिलीज; कधीही पाहिलं नसेल दीपिकाचं इतकं बोल्ड रूप

उफ्फ! ‘गहराइयां’चं पहिलं गाणं ‘डुबे’ रिलीज; कधीही पाहिलं नसेल दीपिकाचं इतकं बोल्ड रूप

Gehraiyaan song Doobey: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या (Siddhant Chaturvedi) ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या आगामी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. येत्या 11 फेबु्रवारीला अ‍ॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा रिलीज होतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘डुबे’ रिलीज झालं आहे.

दीपिका व सिद्धांतवर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात दीपिकाचे अनेक इंटिमेट व बोल्ड सीन्स आहेत. रिलीज होण्याआधीपासून हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करत होतं. रिलीज झाल्यानंतर या गाण्यानं सोशल मीडियावर धूम केली आहे. काहीच तासांस या गाण्यांना 10 लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. कौसर मुनीरने लिहिलेलं हे गाणं गायिका लोथिकाने गायलं आहे.

 ‘गहराइयां’ या सिनेमात दीपिकाने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदा दीपिका  इतक्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे. लग्नाआधी‘राम लीला’मध्ये तिने रणवीरसोबत  किसिंग सीन दिला होता. त्यानंतर आता ‘डुबे’ या गाण्यात दीपिका  सिद्धांतसोबत किसींग सीन देताना दिसतेय. या एका गाण्यात 5 किसिंग सीन आहेत.  

स्वत:पेक्षा वयाने 7 वषार्ने लहान सिद्धांत चतुवेर्दीसोबत किसींग सीन देण्याचा दीपिकाचा अनुभव कसा होता? हा सीन देणं किती कठीण होतं? याबद्दल दीपिका अलीकडे एका मुलाखतीत बोलली होती. ‘ किसींग सीन देणं माझ्यासाठी सोप्पं होतं. कारण मला दिग्दर्शकाचा हेतू माहित होता. दिग्दर्शक शकुन बत्राने आमच्याकडून अगदी सहजरित्या हा सीन करवून घेतला. शकुनने मला आणि आम्हाला सर्वांनाच एक कम्फर्ट दिला. कारण जेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटते तेव्हाच तुम्हाला इंटिमेट सीन करणं सोपं जातं. दिग्दर्शक केवळ लोकांचं लक्ष वेधण्यासाठी नाही तर कथेची आणि पात्रांची गरज म्हणून हा सीन करतोय, हे कळतं तेव्हा असे सीन्स देणे सोप्प होतं,’ असं दीपिका म्हणाली होती.

‘गहराइयां’ या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे.  दीपिका व सिद्धांत शिवाय अनन्या यांच्यासोबतच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: Gehraiyaan song Doobey: Deepika Padukone and Siddhant Chaturvedi movie Gehraiyaan