गौरी खानने मुंबईतील 'या' भागात सुरु केलं आलिशान रेस्टॉरंट, नाव आहे खूपच खास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 19:56 IST2024-02-14T19:55:38+5:302024-02-14T19:56:59+5:30

गौरी खानचं रेस्टॉरंट आहे की आलिशान महल! पाहा झलक

Gauri Khan started a new restaurant in mumbai named torii launched grand opening | गौरी खानने मुंबईतील 'या' भागात सुरु केलं आलिशान रेस्टॉरंट, नाव आहे खूपच खास!

गौरी खानने मुंबईतील 'या' भागात सुरु केलं आलिशान रेस्टॉरंट, नाव आहे खूपच खास!

बॉलिवूड किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानचीही (Gauri Khan) लोकप्रियता काही कमी नाही. गौरी नेहमीच तिची प्रायव्हसी जपताना दिसते. तिची स्वत:ची वेगळी ओळख आहे. गौरी प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. अनेक सेलिब्रिटींची घरं डिझाईन केली आहेत. आता गौरीने तिचा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. तिने मुंबईत स्वत:चं आलिशान हॉटेल उघडलं आहे. याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

मुंबईतील बांद्राच्या पाली हिल या पॉश ठिकाणी गौरीचं 'टोरी' (Torii) हे रेस्टरंट सुरु झालं आहे. या लग्झरी रेस्टॉरंटची झलक पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल. गौरी आपल्या या नवीन व्यवसायासाठी खूपच उत्सुक असल्याचंही दिसत आहे.शेअर केलेल्या फोटोत ती रेस्टॉरंटमध्ये पोज देताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फारच स्टायलिश दिसत आहे. रेस्टॉरंटचं इंटिरियर तिने स्वत:च डिझाईन केलं आहे. एशियन फूड इथली स्पेशालिटी आहे. गौरीच्या या नवीन व्यवसायासाठी मनोरंजनविश्वातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. गोल्डन रंगात रेस्टॉरंट झगमगलं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले, " मुंबईत माझं पहिलं रेस्टॉरंट टोरी तुमच्यासाठी खुलं झालं आहे."

नुकतंच 'टोरी'रेस्टॉरंटचं लाँचिंग पार पडलं. यावेळी गौरीच्या खास मैत्रिणी माहीप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह, नीलम कोठारी आल्या होत्या. तर करण जोहर, संजय लीला भन्साळी हे निर्मातेही दिसले. याशिवाय इतर काही सेलिब्रिटी या लाँचिंगला उपस्थित होते. 

 

Web Title: Gauri Khan started a new restaurant in mumbai named torii launched grand opening