Gashmeer Mahajani : 'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:32 AM2022-11-30T10:32:27+5:302022-11-30T10:34:00+5:30

गश्मीर महाजनीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गश्मीर लवकरच एका हिंदी सिनेमात दिसणार आहे. 

gashmeer-mahajani-doing-chhori-2-horror-film-with-nusrat-bharucha | Gashmeer Mahajani : 'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार

Gashmeer Mahajani : 'गश्मीर'चा बॉलिवुड सिनेमा, 'या' अभिनेत्रीसोबत महत्वाच्या भुमिकेत दिसणार

googlenewsNext

Gashmeer Mahajani : मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सध्या कामात खुपच व्यस्त दिसतोय. एकामागोमाग एक प्रोजेक्ट त्याच्या हातात आहेत. हिंदी मालिका 'इमली' मध्ये त्याने पत्रकार आदित्य कुमार त्रिपाठीची भुमिका साकारली होती. याला लोकांनी भरपुर प्रतिलाद दिला. तर गश्मीर Jhalak dikh la ja  'झलक दिख ला जा' या डान्स शो मध्येही दिसला. इथेही त्याने भल्याभल्यांना टक्कर दिली. आता गश्मीरच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गश्मीर लवकरच एका हिंदीसिनेमात दिसणार आहे. 

बॉलिवुड अभिनेत्री Nusrat Bharucha नुसरत भरुचा हिच्या सोबत गश्मीर मुख्य भुमिकेत दिसणार आहे. २०२१ साली नुसरत भरुचा चा 'छोरी' हा थरारक सिनेमा आला होता. याचाच Siquel सिक्वल येणार आहे ज्यामध्ये गश्मीर महाजनीची वर्णी लागली आहे. पार्ट १ मध्ये अभिनेत्याला फारशी भुमिका नव्हती, मात्र आता पार्ट २ मध्ये अभिनेत्याचीही महत्वाची भुमिका असणार आहे. यासाठी गश्मीरची निवड करण्यात आली आहे.  विशाल फुरिया यांनी छोरी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता तर भुषण कुमार यांनी निर्मिती केली होती. गश्मीरचा हा पहिला बॉलिवुड चित्रपट नाही. त्याने २०१० मध्येच 'मुस्कुराके देख जरा' या हिंदी सिनेमातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते.

गश्मीर महाजनीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 'कॅरी ऑन मराठा' हा त्याचा पहिला मराठी सिनेमा. तसेच हिंदी मालिकांमध्येही केले आहे. देऊळ बंद या मराठी चित्रपटातील गश्मीरची भुमिका सगळ्यांनाच लक्षात राहण्यासारखी आहे. आता नुसरत सोबतच्या या चित्रपटात गश्मीरचा अभिनय बघायला मिळणार आहे.गश्मीरच्या करिअरचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. 

'छोरी' हा २०१७ मध्ये आलेल्या मराठी चित्रपट 'लपाछपी' चा Remake रिमेक आहे. लपाछपी मध्ये पुजा सावंतने मुख्य भुमिका साकारली होती. 

Web Title: gashmeer-mahajani-doing-chhori-2-horror-film-with-nusrat-bharucha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.