Saba Saudagar Wedding: गंदी बात फेम अभित्रीने गुपचूप बॉयफ्रेंड सोबत बांधली लग्नगाठ, आता फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 16:54 IST2023-05-15T16:49:59+5:302023-05-15T16:54:46+5:30
परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा शनिवारी साखरपुडा झाला. तर दुसरीकडे आणखी एका अभिनेत्रीने लग्न केले, ज्याची बातमी कोणाच्याही कानावर ही आली नाही.

Saba Saudagar Wedding: गंदी बात फेम अभित्रीने गुपचूप बॉयफ्रेंड सोबत बांधली लग्नगाठ, आता फोटो आले समोर
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा शनिवारी साखरपुडा झाला. तर दुसरीकडे आणखी एका अभिनेत्रीने लग्न केले, ज्याची बातमी कोणाच्याही कानावर ही आली नाही. आम्ही बोलत आहोत सबा सौदागर Saba Saudagar)बद्दल, जिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत गुपचूप सातफेरे घेतलं लग्न केलं.
सबाने तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि लेखक-दिग्दर्शक चिंतन शाहसोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. साबा आणि चिंतन यांनी 10 मे 2023 रोजी कोर्ट मॅरेजसाठी नोंदणी केली होती आणि त्यानंतर 11 मे रोजी दोघांनी गोव्यात त्यांच्या जवळचे लोक आणि मित्रांच्या उपस्थित लग्न केले.
या कपलने गोव्याच्या बीचवर अगदी साधेपणाने लग्न केले. या खास प्रसंगी सबा सौदागरने लाल रंगाची साडी नेसली होती. त्यावर हिरव्या रंगाचे दागिने कॅरी करा. तर दुसरीकडे चिंतन शाह क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.
या जोडप्याच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर दोघे एकमेकांना जवळपास ६ वर्षे डेट करत होते. आता लग्नानंतर हे कपल हनीमूनसाठी युरोपला जाणार आहे. सबाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिला 'गांदी बात' या वेब सीरिजमधून ओळख मिळाली. ती 'बू सबकी फतेगी' आणि 'क्रॅकडाउन' सारख्या ओटीटी शोमध्ये देखील दिसली आहे.