इकडे 'गदर २'ने पार केला २०० कोटींचा टप्पा, सनी देओलने केलं जंगी सेलिब्रेशन, यूजर्स म्हणाले- '300 कोटींहून अधिक कमाई करेल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:32 IST2023-08-16T15:30:25+5:302023-08-16T15:32:26+5:30
चित्रपटाने 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई करत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

इकडे 'गदर २'ने पार केला २०० कोटींचा टप्पा, सनी देओलने केलं जंगी सेलिब्रेशन, यूजर्स म्हणाले- '300 कोटींहून अधिक कमाई करेल'
सनी देओल स्टारर 'गदर 2' धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांपासून ते समीक्षकांनाहीआवडला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 5 व्या दिवशीच 200 कोटींचा आकडा पार केला आहे. अलीकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सनी पाजी त्यांच्या टीमसह चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील झाल्याचा आनंद साजरा करताना दिसत आहे.
तारा सिंग आणि सकिना यांच्या जोडीने पुन्हा एकदा गदरमध्ये आपली जादू दाखवली आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल या जोडीला पूर्वीसारखेच प्रेम मिळाले आहे. प्रत्येकाला ही जोडी पुन्हा बघायची आहे. चित्रपटाने 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह, 'गदर 2' चित्रपटाचे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन आता 228.58 कोटी रुपयांवर गेले आहे. चित्रपटाचे कलेक्शन आणि मिळालेले प्रेम पाहून सनी देओल भारवून गेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, गदर 2 ची टीम सनी पाजीला सांगत आहे की हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यानंतर संपूर्ण टीम टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करते आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले- सिनेमा ३०० कोटींहून अधिक कमाई करेल. आणखी एकाने लिहिले- लव्ह यू सनी पाजी गदर २.
अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 हा 2001 मध्ये रिलीज झालेल्या गदरचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने 40 कोटींहून अधिकची कमाई पहिल्याच दिवशी केली होती.