अमेरिकेत लेकासोबत पिझ्झा पार्टी करताना दिसले धर्मेंद्र , सनी देओलने शेअर केलेल्या फोटोवर ईशाने केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 16:34 IST2023-09-18T16:31:58+5:302023-09-18T16:34:46+5:30

सनी देओलने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर त्याची सावत्र बहिण ईशा देओलने कमेंट केली आहे.

Gadar 2 actor sunny deol share picture with father dharmendra enjoying pizza in america esha deol reacted | अमेरिकेत लेकासोबत पिझ्झा पार्टी करताना दिसले धर्मेंद्र , सनी देओलने शेअर केलेल्या फोटोवर ईशाने केली कमेंट

अमेरिकेत लेकासोबत पिझ्झा पार्टी करताना दिसले धर्मेंद्र , सनी देओलने शेअर केलेल्या फोटोवर ईशाने केली कमेंट

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने ते मुलगा सनी देओलबरोबर अमेरिकेला उपचारासाठी गेल्याचं वृत्त होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चिंता सतावत होती. मात्र हेमा मालिनी यांनी ते  उपचारासाठी नाही तर रुटीन चेकअपसाठी गेल्याची माहिती चाहत्यांना देत त्यांच्यातील संभ्रम दूर केला. याच  दरम्यान धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात धर्मेंद्र अमेरिकेत एन्जॉय करताना दिसतायेत. 

सनी देओलने  धर्मेंद्र यांच्यासोबतच्या एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमधून दोघांमधील स्पेशल बॉन्डिंग दिसून येतेय. फोटोमध्ये दोघेही अमेरिकेत पिझ्झा एन्जॉय करताना दिसत आहेत. सनीने फोटोला कॅप्शन दिले आहे की, "पापा आणि मी  पिझ्झाचा आनंद घेताना."

फोटोत वडील आणि मुलीची जोडी नेहमीप्रमाणेच खास दिसत आहे. फोटोमध्ये, धर्मेंद्र यांनी डेनिम शर्ट आणि काळी कॅप घातली आहे, तर सनीने पांढरा टी-शर्ट, निळी कॅप आणि सनग्लासेस घातलेला दिसत आहे. ईशा देओलनेही या फोटोवर प्रतिक्रिया देत हार्ट इमोटिकॉन (नजर लागू नये सिम्बॉल ) पोस्ट केला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र उपचारासाठी नाही तर अमेरिकेत लेकाबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत. सनी देओलच्या टीमकडून याची माहिती देण्यात आली आहे. “सनी पाजी आई आणि वडिलांबरोबर अमेरिकेत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत. धर्मेंद्रजी एकदम तंदुरुस्त आहेत. काळजी करण्याचं काहीच कारण नाही,” असं त्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

Web Title: Gadar 2 actor sunny deol share picture with father dharmendra enjoying pizza in america esha deol reacted