सनी पाजीच्या 'गदर २' ने करुन दाखवलं! रिलीजनंतर २४ व्या बॉक्स कमावला ५०० कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 11:02 IST2023-09-04T10:52:51+5:302023-09-04T11:02:47+5:30
रिलीजच्या २४ व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर सनी पाजीच्या 'गदर २'चा दबदबा कायम दिसला.

सनी पाजीच्या 'गदर २' ने करुन दाखवलं! रिलीजनंतर २४ व्या बॉक्स कमावला ५०० कोटींचा गल्ला
सनी देओलच्या (Sunny Deool) 'गदर 2'चा (Gadar 2) धुमाकूळ काही थांबता थांबत नाही. २४ दिवस झाले सिनेमा कमाईचे डोंगर रचतोय. अलिकडेच या सिनेमाची सक्सेस पार्टीदेखील पार पडली. यात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचे तीनही खान सुद्धा या पार्टीला उपस्थित होते. यादरम्यान रविवारी या सिनेमा बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. रिलीजच्या २४ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सनी पाजीच्या 'गदर २'चा दबदबा कायम दिसला.
'गदर 2' ने रिलीजच्या पहिल्या तीन आठवड्यांत चित्रपटाने ज्या वेगाने कमाई केली, त्यामुळे चौथ्या वीकेंडपूर्वीच हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, असा अंदाज बांधला जात होता. सिनेमाने पहिल्या आठवड्यात 284.63 कोटींची कमाई केली, दुसऱ्या आठवड्यात १३४.४७ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात ६३.३५ कोटी कमावले. चौथ्या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या शनिवारी 493.37 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारच्या कलेक्शनच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, चित्रपटाने जवळपास 8.50 कोटी रुपयांच्या कमाईसह 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
सनी देओलची क्रेझ परत आली आहे. अनिल शर्मा यांच्या 'गदर 2' चं एकूण बजेट केवळ 60 कोटी होतं. तर सिनेमाने बजेटच्या आठपट कमाई केली आहे. दरम्यान 'गदर 2' सध्यातरी २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा आहे. शाहरुखच्या 'पठाण'ने एकूण 543.5 कोटींची कमाई केली आहे. पठाणचं रेकॉर्ड मोडण्यासाठी 'गदर 2'ला आणखी 68.55 कोटींचं कलेक्शन करण्याची गरज आहे.