अशक्य ते शक्य... रेमोच्या पत्नीचं लय भारी ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं ४४ किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 21:12 IST2023-05-29T21:05:54+5:302023-05-29T21:12:07+5:30
लेजल गेल्या अनेक महिन्यांपासून आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होती

अशक्य ते शक्य... रेमोच्या पत्नीचं लय भारी ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं ४४ किलो वजन
बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाच्या पत्नीचा मेकओव्हर सध्या बॉलिवूडसह सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. लिजेल डिसुजाने ४० किलो वजन कमी करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. स्वत: रेमोने लेजलच्या दोन्ही फोटोंचा एक कोलाज फोटो शेअर करत तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक केलय. लिजेलचे वजन एकेकाळी १०५ किलो एवढे होते. पण, तिने ७ महिने मेहनत घेऊन अविश्वसनीय गोष्ट सत्यात उतरवली आहे. लेजलच्या दोन फोटोतील फरक पाहून तुम्ही त्याचा अंदाज बांधू शकता.
लेजल गेल्या अनेक महिन्यांपासून आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यासाठी, तिने मोठी मेहनत आणि डाएट केला. केवळ वेट लॉसच्या माध्यमातून लेजलने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं असून तिच्या नव्या लूकची चांगलीच चर्चा आणि कौतुकही होतंय. १०५ किलो वजनावरुन लेजल आता थेट ६६ किग्रॅ वजनापर्यंत खाली आहे.
रेमोने आपल्या पत्नीच्या कौतुक करताना म्हटलंय की, इथपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच खूप मेहनत घ्यावी लागते. सर्वात मोठा सामना आपल्याला स्वत:शीच करावा लागतो. मी लेजला अशी लढाई लढताना पाहिलं आहे. त्यामुळेच, तिने अशक्य ते शक्य करुन दाखवलंय. मी तिला नेहमीच म्हटले की, हे सर्वकाही तुच्या मनावर निर्धारित आहे. तुला हेच मजबूत बनवायचं आहे, आणि तू हे करुन दाखवलं. लेज, मला तुचा अभिमान आहे. तू माझ्यापेक्षा ताकदवर आहे, तू माझी प्रेरणा आहेस, लव्ह यू... असे म्हणत रेमोने पत्नी लेजलचं कौतुक केलंय.
रेमोने शेअर केलेल्या फोटोतील बदल पाहून तुम्हालाही निश्चितच आश्चर्य वाटेल. पण, लिजेलने हे करुन दाखवलंय. रेमोच्या या पोस्टवर अभिनेता वरुण धवनने कमेंट केली आहे. वाओ लिज... असं म्हटलंय. तर, पत्नी लिजेलनेही रेमोच्या पोस्टवर कमेंट करत आय लव्ह यू बेबी... असं म्हटलंय.