द फॉरगॉटन आर्मीमधील शर्वरी वाघ आहे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:32 IST2020-01-27T13:30:02+5:302020-01-27T13:32:53+5:30

शर्वरी ही महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याची नात असून तिचे आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.

The Forgotten Army fame sharvari wagh is granddaughter of x chief minister of maharashtra manohar joshi | द फॉरगॉटन आर्मीमधील शर्वरी वाघ आहे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात

द फॉरगॉटन आर्मीमधील शर्वरी वाघ आहे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात

ठळक मुद्देशर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. 

अ‍ॅमेझोन प्राईमवर नुकतीच द फॉरगॉटन आर्मी ही वेबसिरिज नुकतीच सुरू झाली आहे. या सिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. कबीर सिंगने दिग्दर्शित केलेल्या या वेबसिरिजमध्ये सनी कौशल, शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांच्याही अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण त्याचसोबत शर्वरीच्या सौंदर्याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. 

शर्वरी प्रेक्षकांना लवकरच बंटी और बबली 2 या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिची जोडी गली बॉय फेम सिद्धार्थ चर्तुवेदीसोबत जमणार आहे. शर्वरी ही महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याची नात असून तिचे आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तिच्या आजोबांचा राजकारणात चांगलाच दबदबा आहे. शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. 

राजकारणात आपला ठसा उमटवलेले दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्याने आपल्या अभिनयाने बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपले एक स्थान निर्माण केले आहे. आता त्याच्यानंतर आणखी एका महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्याच्या कुटुंबातील व्यक्तीने अभिनयक्षेत्रात प्रवेश केला आहे. रितेश प्रमाणे ती देखील अभिनयक्षेत्रात आपली जागा निर्माण करेल अशी सगळ्यांना आशा आहे. 

Web Title: The Forgotten Army fame sharvari wagh is granddaughter of x chief minister of maharashtra manohar joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.