Video : 'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, "ऐश्वर्या, ऐश्वर्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 09:37 IST2023-05-03T09:36:10+5:302023-05-03T09:37:13+5:30

भारतीय पापाराझींनी हॉलिवूड स्टार्सच्या नावारुन उडवलेल्या खिल्लीचा परदेशी पापाराझींनी बदला घेतला

Foreign paparazzi mistaken alia bhat for aishwarya rai in met gala 2023 | Video : 'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, "ऐश्वर्या, ऐश्वर्या..."

Video : 'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, "ऐश्वर्या, ऐश्वर्या..."

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhat) नुकतेच सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट मेट गाला २०२३ (Met Gala 2023) मध्ये हजेरी लावली. १ लाख मोत्यांनी बनवलेला व्हाईट गाऊन तिने परिधान केला होता. या लुकमध्ये आलिया जणू परीच दिसत होती. याआधी मेट गालामध्ये भारताकडून ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी सहभाग घेतला आहे. तर आलियाने यंदा पदार्पण केलं. आलियाची रेड कार्पेटवर एंट्री होताच तिथल्या पापाराझींनी मात्र तिला ऐश्वर्या अशी हाक मारली. तरी आलियाने चेहऱ्यावर गोड हसू ठेवत कॅमेऱ्याला पोज दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'मेट गाला २०२३' च्या रेड कार्पेटवर एकापेक्षा एक फॅशन अवतारात कलाकारांनी हजेरी लावली होती. आलियाचा लुक कसा असेल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. नेहमीप्रमाणेच आलियाने तिच्या सुंदर फॅशनने सर्वांना प्रेमात पाडलं. आलिया रेड कार्पेटवर आली असता परदेशी पापाराझींकडून मात्र एक चूक झाली. काही पापाराझींनी तिला 'ऐश्वर्या, दिस वे दिस वे' अशी हाक मारली. त्यामुळे आलिया भटला अनेक जण ऐश्वर्याच समजले. तरी आलियाने कॅमेऱ्यासमोर छान पोज दिली.

हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. यापूर्वी मेट गालामध्ये ऐश्वर्या रॉयला कॅटरिना अशी हाक मारली गेली होती. तर हॉलिवूड स्टार झेंडाया, गिगी हदीद जेव्हा भारतात आले होते तेव्हा भारतीय पापाराझींनीही त्यांना विनोदी पद्धतीने हाक मारली होती. परदेशी पापाराझींनी हाच बदला घेतला की काय अशी मस्करी नेटकऱ्यांनी केली. 

Web Title: Foreign paparazzi mistaken alia bhat for aishwarya rai in met gala 2023