SEE PICS : जगासाठी रहस्य बनली ही ‘Nude Yoga Girl’, मलायका अरोराही करते फॉलो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 10:22 IST2019-10-01T10:04:40+5:302019-10-01T10:22:14+5:30
तिचे फोटो शरीराला एका सुंदर कलाकृतीच्या रूपात प्रदर्शित करतात. मात्र या अकाऊंटमध्ये जिचे फोटो आहेत, ती योगा गर्ल मात्र अद्यापही जगासाठी रहस्य बनली आहे.

SEE PICS : जगासाठी रहस्य बनली ही ‘Nude Yoga Girl’, मलायका अरोराही करते फॉलो!
ठळक मुद्दे‘न्यूड योगा गर्ल’ नावाने सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. हे अकाऊंट मलायकासह अनेक सेलिब्रिटी फॉलो करतात.
बॉलिवूड असो वा टीव्ही इंडस्ट्री सध्या दोन्हींकडे फिटनेसची जबरदस्त क्रेज आहे. मलायका अरोरा, करिना कपूर असो वा टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया असे अनेक सेलिब्रिटी आपल्या योगा व फिटनेस ट्रेनिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. फिटनेस फ्रिक असलेल्या या सेलिब्रिटींचे लाखो चाहते आहेत. पण फिटनेसप्रेमी असलेले हे सेलिब्रिटी मात्र दुस-याच एका ‘योगा गर्ल’च्या प्रेमात आहेत. होय, मलायका अरोरा शिवाय तिच्यासारखेच अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलो करतात. हे अकाऊंट कुणाचे तर ‘न्यूड योगा गर्ल’चे.
होय, ‘न्यूड योगा गर्ल’ नावाने सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. हे अकाऊंट मलायकासह अनेक सेलिब्रिटी फॉलो करतात. 2015 पासून सुरु करण्यात आलेल्या या अकाऊंटवर एक महिला योग मुद्रेतील आपले अनेक नग्न फोटो शेअर करते. पण ही महिला कोण, हे कुणालाही ठाऊक नाही. तिचे फोटो शरीराला एका सुंदर कलाकृतीच्या रूपात प्रदर्शित करतात. मात्र या अकाऊंटमध्ये जिचे फोटो आहेत, ती योगा गर्ल मात्र अद्यापही जगासाठी रहस्य बनली आहे.
या अकाऊंटचे लोक प्रचंड ‘दिवाने’ आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. मलायकाशिवाय अर्जुन कपूर, टीव्ही अभिनेत्री एबी गिल, निशा रावल, आयशा गोरडिया असे अनेक जण या अकाऊंटला फॉलो करतात. या अकाऊंटचे 10 लाखांवर फॉलोअर्स आहेत. या योगा गर्लचे फोटो तुम्हीही पाहा आणि कसे वाटलेत ते आम्हाला जरूर कळवा.