Flashback 2019 : या अभिनेत्यांसाठी हे वर्षं ठरले सुपरहिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 19:44 IST2019-12-27T19:39:29+5:302019-12-27T19:44:56+5:30
या वर्षांत अनेक अभिनेत्यांनी हिट चित्रपट दिले.

Flashback 2019 : या अभिनेत्यांसाठी हे वर्षं ठरले सुपरहिट
2019 मध्ये बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगला व्यवसाय केला. जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्यांसाठी हे वर्षं ठरले सुपरहिट
शाहिद कपूर
कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका यात शाहिदने साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. शाहिदच्या कारकिर्दीतील हा पहिला सोलो हिट चित्रपट आहे.
अजय देवगण
दे दे प्यार दे या चित्रपटात अजय देवगणचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.
विकी कौशल
विकीसाठी 2019 हे वर्षं खूप चांगले ठरले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या त्याच्या उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले. या चित्रपटातील त्याचा अभिनय तर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला.
सलमान खान
सलमानच्या भारत या चित्रपटाने 300 कोटीहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला. तसेच त्याच्या दबंग 3 या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अक्षय कुमार
अक्षय कुमारने या वर्षांत केसरी आणि मिशन मंगल असे दोन हिट चित्रपट दिले. त्याच्या हाऊसफुल 4 या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा गुड न्यूज हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला समीक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रणवीर सिंग
रणवीर सिंगने गली बॉय या चित्रपटात झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका मुलाची भूमिका साकारली होती. या मुलाला एक प्रसिद्ध रॅपर बनण्याची इच्छा असते. एक सामान्य मुलगा ते प्रसिद्ध रॅपर असा नायकाचा प्रवास प्रेक्षकांना गली बॉयमध्ये पाहायला मिळाला होता. या भूमिकेसाठी रणवीरला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
अमिताभ बच्चन
बदला या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाची कथा देखील प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.