पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:33 IST2021-10-08T13:32:06+5:302021-10-08T13:33:59+5:30

गेल्या काही दिवसांपासून Samantha आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. यापूर्वी तिनं Naga Chaitanya पासून विभक्त होणार असल्याची दिली होती माहिती.

First photo shared by Samantha Ruth Prabhu after separation from husband | पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो

पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून Samantha आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती.यापूर्वी तिनं Naga Chaitanya पासून विभक्त होणार असल्याची दिली होती माहिती.

दक्षिणेकडील चित्रपटातील सुपरस्टार समांथ रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. तिनं पती नागा चैतन्य याच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर ती चर्चेत आली होती. या घोषणेनंतर तिनं पहिल्यांना आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) काही शेअर केलं आहे. समांथानं गुरूवारी इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला. व्हाईट ड्रेसमध्ये तिनं आपला एक सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याची पत्नी समांथा अक्कीनेनी हे साऊथचे लोकप्रिय कपल. पण गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये फार काही ऑल वेल नसल्याच्या चर्चा आहेत. समांथा व नागा चैतन्य या दोघांच्या नात्यात मतभेद निर्माण झाल्याचे शिवाय दोघेही काही दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याच्याही माहिती समोर आली होती.


मुंबईत स्थायिक होण्याचीही होती चर्चा
समांथानं इंस्टाग्रामवर लाइव्ह येऊन चाहत्यांशी बातचीत केली आणि तिच्या प्रश्नांची उत्तरेदेखील दिली. या चॅट सेशन दरम्यान अभिनेत्रीला चाहत्यांना प्रश्न विचारला की, खरंच तुम्ही मुंबईला शिफ्ट होणार आहात का?, त्यावर समांथाने कोणतेही आडेवेडे न घेता युजर्सच्या प्रश्नांचे उत्तर दिलं आणि म्हटले की, मला माहित नाही माझ्याबद्दल इतक्या अफवांना कशी सुरूवात झाली आणि पसरली. शंभर प्रकारच्या अफवा आहेत, ज्या खऱ्या नाहीत. हैदराबादमध्ये माझे घर आहे आणि तेच माझे घर राहणार आहे. हैदराबादने मला सर्व काही दिले आहे. मी इथेच आनंदाने पुढेही राहणार आहे. समांथाच्या उत्तराने स्पष्ट झाले की, ती मुंबईला शिफ्ट होत नाही आहे. समांथा आणि नागा चैतन्यच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर दोघांनी २०१७ मध्ये गोव्यात ग्रॅण्ड डेस्टिनेशन वेडिंग केले होते.

Web Title: First photo shared by Samantha Ruth Prabhu after separation from husband