'अतरंगी रे'चा फर्स्ट लूक रिलीज, हटके अवतारात दिसले अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 21:12 IST2021-11-23T21:10:25+5:302021-11-23T21:12:35+5:30
अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा आगामी चित्रपट अतरंगी रेचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

'अतरंगी रे'चा फर्स्ट लूक रिलीज, हटके अवतारात दिसले अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष
अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा आगामी चित्रपट अतरंगी रेचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज करण्यात येणार आहे. याबद्दल या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा या चित्रपटातील फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. शेअर केलेल्या फर्स्ट लूक व्हिडीओमधून समजते आहे की सारा अली खानचे नाव रिंकू आहे, जी प्रेमात वेडी आहे. तर धनुष चित्रपटात विशूच्या भूमिकेत दिसणार आहे.
सारा अली खानने अक्षय कुमारचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले की, प्रत्येकवेळी अतरंगी स्टाईलमध्ये एंट्री करतात. त्यांची ताकद आणि प्रेम बघून सर्वजण पराभूत होतात. तर अभिनेता धनुषचे पोस्टर शेअर करताना ती म्हणाली, विशूला भेटा, हे चित्रपटातील आमचे पहिले पात्र आहे. जे इतर कोणी करू शकले नसते.
त्यानंतर अक्षय कुमारने सारा अली खानचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्याला कॅप्शन देताना तो म्हणाला, ही मुलगी प्रेमात वेडी झाली आहे. भेटा अतरंगी नंबर एक रिंकूला.
‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा सिनेमा आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती.