हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचला सुनील शेट्टी, म्हणाला "अद्भुत आणि दिव्य..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:05 IST2025-02-13T11:56:13+5:302025-02-13T12:05:53+5:30
सुनील शेट्टी यानेही महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.

हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचला सुनील शेट्टी, म्हणाला "अद्भुत आणि दिव्य..."
Suniel Shetty At Mahakumbh: सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा विशाल सोहळा असणारा 'महाकुंभ मेळा' सुरू आहे. देशातील विविध भागांतून बहुसंख्येने साधू – संत, सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकीय, मनोरंजन आदी विविध क्षेत्रातील मंडळी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यानेही महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे औद्योगिक विकास मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांनी नंदी सेवा संस्थेच्या शिबिरात सुनील शेट्टीचं स्वागत केलं. माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, "महाकुंभासाठी ज्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे, ती अद्भुत आणि दिव्य आहे. कोट्यवधी लोकांचे आगमन आणि गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर पवित्र स्नान करणे ही खरोखरच सनातनची शक्ती आहे. दर तासाला लाखो लोक स्नान करून निघून जात आहेत. अशी व्यवस्था कुठेही होऊ शकत नाही. महाकुंभाला येणे आणि गंगा नदीत डुबकी मारणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आहे".
गेल्या १३ जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभमेळा पुढचे ४५ दिवस म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दर १२ वर्षांनी कुंभमेळा येतो, पण यावेळी तो अधिक विशेष आहे. कारण १४४ वर्षांनंतर निर्माण होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या महाकुंभमेळ्याचे अधिक महत्त्व आहे. या कुंभमेळ्याचा अनुभव घ्यावा अशी इच्छा अनेकांची असते. सुनील शेट्टीची हीच इच्छा अकस्मात पूर्ण झाली आणि त्याला महाकुंभमेळ्याचा अनुभव घेता आला. सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच 'हंटर २' ची घोषणा झाली आहे. ही सीरिज या वर्षी MX Player वर प्रदर्शित होईल.