Kalki 2898 AD : किती आहे प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'चं एकूण बजेट? कोणी किती घेतलं सर्वाधिक मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:47 AM2024-06-13T09:47:40+5:302024-06-13T09:48:30+5:30

'कल्की 2898 एडी'साठी सर्व स्टार्सनी कोटींमध्ये मानधन घेतले आहे.

Fees of the cast of 'Kalki 2898 AD': From prabhas to Amitabh-Kamal Haasan, know who charged how much | Kalki 2898 AD : किती आहे प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'चं एकूण बजेट? कोणी किती घेतलं सर्वाधिक मानधन

Kalki 2898 AD : किती आहे प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'चं एकूण बजेट? कोणी किती घेतलं सर्वाधिक मानधन

यंदाचा बहुप्रतिक्षित असलेला साय-फाय सिनेमा म्हणजे 'कल्की 2898 एडी'. सुपरस्टार प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन यांसारख्या दिग्गजांसह  दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी सुद्धा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाने प्रचंड लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय सर्व चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजची आतुरता आहे. या सगळ्यात सिनेमाचं बजेट किती आहे आणि कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं ते जाणून घेऊ.

'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात दमदार व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. सिनेमात आधुनिक तंत्रज्ञानावर मोठा खर्च करण्यात आला आहे. हा चित्रपट 600 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. India Heraldच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन मुख्य अभिनेता प्रभासने 150 कोटी रुपये घेतले आहेत. तर 'कल्की 2898 एडी'मध्ये दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दीपिकाने 'कल्की 2898 एडी'या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतले आहे. 

तर बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'कल्की 2898 एडी' मध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्यांनी 18 कोटी रुपये आकारले असल्याचे बोलले जात आहे. तर कमल हसन यांनी 20 कोटी रुपये आकारले आहेत. यासोबतच दिशा पटानीने चित्रपटासाठी फक्त 2 कोटी रुपये फी घेतली आहे. 

 नुकतेच सिनेमाचा ट्रेलर रीलिज झाला. ''कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरमध्ये प्रत्येक सीन धमाकेदार आहे. ट्रेलरच्या सुरुवातील काशी नगरी पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि पुढे दीपिका पादुकोणची झलक पाहायला मिळते. त्यानंतर प्रभासची दमदार एन्ट्री होते. चित्रपटाच्या गोष्टीत महाभारताचे काही भाग दाखवले जाणार आहेत. चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसून येणार आहेत. 

नाग अश्विन दिग्दर्शित, कल्की 2898 एडी' हा वर्षातील सर्वात मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरेल यात शंका नाही. 'कल्कि 2898 एडी' सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय. वैजयंती मूव्हीज निर्मित हा सिनेमा 27 जून 2024 रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

Web Title: Fees of the cast of 'Kalki 2898 AD': From prabhas to Amitabh-Kamal Haasan, know who charged how much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.