बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर,‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही कोरोना पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:49 IST2021-03-29T16:48:50+5:302021-03-29T16:49:52+5:30

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिलाही कोरोनाने ग्रासले आहे.

fatima sana shaikh tested corona positive | बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर,‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही कोरोना पॉझिटीव्ह

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर,‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही कोरोना पॉझिटीव्ह

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ‘दंगल’मध्ये सनाच्या वडिलांची भूमिका साकारणा-या आमिर खानलाही कोरोनाची लागण झाली आहे.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख हिलाही कोरोनाने ग्रासले आहे. सनाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली.
सनाने तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी घरीच क्वारंटाइन असून शक्य ती सर्व खबरदारी घेतेय,’ असे सनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला फातिमा अनिल कपूरसोबत एका चित्रपटाच्या शूटींगसाठी राजस्थानमध्ये गेली होती. या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. 

काही दिवसांपूर्वी ‘दंगल’मध्ये सनाच्या वडिलांची भूमिका साकारणा-या आमिर खानलाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तो सुद्धा होम क्वारंटाइन आहे.
गेल्या काही बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान, तारा सुतारिया, संजय लीला भन्साळी आदींचा यात समावेश आहे.

Web Title: fatima sana shaikh tested corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.