अखेर आमिरसोबतच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर Fatima Sana Shaikh सोडलं मौन म्हणाली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 13:56 IST2021-11-27T13:54:24+5:302021-11-27T13:56:01+5:30
आमिर खानसह माझे नाव जोडले जात आहे. आमिर खानची तिसरी पत्नी म्हणून माझी नेगिटीव्ह पब्लिसिटी केली जात आहे.

अखेर आमिरसोबतच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर Fatima Sana Shaikh सोडलं मौन म्हणाली…
बॉलिवूड अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या सिनेमापेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. किरण रावसह घटस्फोट झाल्यानंतर आमिर खान तिस-यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता तिस-यांदा लग्न करणार ती सुद्धा एका अभिनेत्रीशी. त्यामुळे आमिर खानची तिसरी पत्नी होणारी अभिनेत्री कोण असणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले होते. अनेकांना फातिमा सना शेखसोबत तो लग्न करणार असल्याचे चर्चा जोर धरत होत्या. सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलही केले जात होते. दिवसेंदिवस तिला ट्रोल करण्याचे प्रमाणही वाढत होते. आमिर खान आणि फातिमा यांच्या अफेअरच्या चर्चा प्रचंड रंगत असताना आता फातिमानेच पुढाकार घेत मौन सोडले आहे.
सध्या आमिर खानसह माझे नाव जोडले जात आहे. आमिर खानची तिसरी पत्नी म्हणून माझी नेगिटीव्ह पब्लिसिटी केली जात आहे. हे सगळं खरंच खूप त्रासदायक आहे. सगळ्यात जास्त माझ्या कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतोय. आपल्या मुलीचा फोटो वर्तमानपत्रात झळकल्याचा त्यांना खूप आनंद व्हायचा. मात्र सध्या उलट सुलट चर्चा घडवून आल्या जात आहे. आमिर खानसह माझा फोटो पब्लिश करत उगाच चर्चा घडवल्या जात आहे. हे सगळं पाहून माझ्या आईलाही खूप वाईट वाटतंय. माझ्यामुळे कुटुंबालाही त्रास सहन करावा लागत आहे. हे सगळं पाहून आता बोलण्याची गरज आहे असे वाटु लागले. त्यामुळेच मी होणाऱ्या चर्चांवर पूर्णविराम लावायचं ठरवलं आहे.
हे सगळं माझ्यासाठी खूप विचित्र आहे. जेव्हा जेव्हा माझी आई हे सगळं टीव्हीवर पाहायची तेव्हा तिला खुप दु:ख होतं होतं. माझा फोटो वर्तमानपत्रात आला की, तिला खूप आनंद व्हायचा, पण जेव्हा ती अशा हेडलाईन वाचते तेव्हा तिला फार वाईट वाटायचं. माझ्याबद्दलच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकून मलाही त्रास झाला आहे. त्यानंतर मी विचार केला की आता मला माझे बोलणे सगळ्यांसमोर मांडण्याची गरज आहे.”