प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:57 IST2026-03-26T08:55:22+5:302026-03-26T08:57:19+5:30

वयाच्या ३९ व्या वर्षी हा प्रसिद्ध अभिनेता बाबा होणार आहे. अभिनेत्याने केलेलं खास फोटोशूट चाहत्यांना आवडलं आहे

Farzi actor Bhuvan Arora and wife Vaneja Gupta announce pregnancy share adorable photos | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ३९ व्या वर्षी होणार बाबा; होडीत बसून पत्नीसह केलं खास फोटोशूट

'फर्जी' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये शाहिद कपूरच्या मित्राची म्हणजेच 'फिरोज'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता भुवन अरोरा सध्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. भुवन आणि त्याची पत्नी वनेजा गुप्ता लवकरच आई-बाबा होणार असून, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

भुवनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पत्नीसोबतचे काही अतिशय सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये वनेजा आपला 'बेबी बंप' फ्लॉन्ट करताना दिसत असून दोघांच्याही चेहऱ्यावर आई बाबा होणार असल्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नदीकिनारी होडीत बसून या दोघांनी हे खास फोटोशूट केलं. या पोस्टला भुवनने एक हृदयस्पर्शी कॅप्शन दिले असून, "आमच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे," असे म्हणत त्याने ही गोड बातमी जाहीर केली आहे.


भुवन आणि वनेजा यांचे लग्न गेल्या वर्षी झाले होते. वनेजा ही एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे. या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि आनंद पाहून चाहते आणि सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. भुवन अरोराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, 'फर्जी'मधील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर तो कार्तिक आर्यनसोबत 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. लवकरच तो शाहिद कपूरसह 'फर्जी २' वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

Web Title : प्रसिद्ध अभिनेता भुवन अरोड़ा 39 की उम्र में बनेंगे पिता; विशेष फोटोशूट।

Web Summary : 'फर्जी' से मशहूर हुए अभिनेता भुवन अरोड़ा और उनकी पत्नी वनेजा गुप्ता जल्द ही माता-पिता बनने वाले हैं। उन्होंने नाव में फोटोशूट कराकर वनेजा के बेबी बंप की तस्वीरें साझा कीं। भुवन जल्द ही 'फर्जी 2' में दिखेंगे।

Web Title : Bhuvan Arora, 39, to become a father; special photoshoot.

Web Summary : Actor Bhuvan Arora, known for 'Farzi,' and his wife, Vaneja Gupta, are expecting their first child. They shared photos of Vaneja's baby bump from a boat photoshoot. Bhuvan will be seen in 'Farzi 2' soon.