'फक्त तुझ्याकडे पाहात रहावं'; शिबानीसोबत लग्न केल्यानंतरही फरहान अख्तर पुन्हा पडला प्रेमात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:39 IST2022-03-23T18:38:29+5:302022-03-23T18:39:06+5:30
Farhan akhtar:फरहानने लग्नानंतर इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्येच आता त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे.

'फक्त तुझ्याकडे पाहात रहावं'; शिबानीसोबत लग्न केल्यानंतरही फरहान अख्तर पुन्हा पडला प्रेमात?
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या जोडीने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या लग्नसोहळ्याची बराच काळ चर्चा रंगली. अगदी शिबानीच्या वेडिंग ड्रेसपासून ते तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत आली होती. यामध्येच आता फरहानची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे फरहान पुन्हा प्रेमात पडला की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
फरहानने लग्नानंतर इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्येच आता त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे.या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन लक्ष वेधत आहे. इतकंच नाही तर तो प्रेमात पडलाय असंही काही जणांनी म्हटलं आहे. पण हो फरहान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे.
फरहान पुन्हा एकदा प्रेमात पडला असून ही व्यक्ती दुसरी- तिसरी कोणी नसून त्याची पत्नी शिबानीच आहे. फरहानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिबानी आनंदाने टाळ्या वाजवत आहे. तर, फरहान तिच्याकडे पाहात बसला आहे.
''तू अशीच हसत राहा आणि मी फक्त तुझ्याकडे असंच पाहात बसेन'', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे फरहान पुन्हा शिबानीच्या प्रेमात पडला आहे असं म्हटलं जात आहे. शिबानी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अमेरिकेतील एका टीव्ही चॅनेलमध्ये अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तसंच तिने आयपीएलचा एक सीजन होस्टही केला आहे.