'डॉन ३' रखडला की बंदच पडला? फरहान अख्तरने अखेर मौन सोडलं; दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:07 IST2025-02-26T14:49:07+5:302025-02-26T15:07:41+5:30
'डॉन ३'बाबतचे प्रश्न टाळत नाहीए पण...फरहान अख्तर काय म्हणाला?

'डॉन ३' रखडला की बंदच पडला? फरहान अख्तरने अखेर मौन सोडलं; दिली मोठी अपडेट
फरहान अख्तर निर्मित 'डॉन 3'ची (Don 3) काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली होती. यामध्ये शाहरुख खान नाही तर रणवीर सिंह असणार हेही रिव्हील करण्यात आलं. मात्र काही दिवसांपूर्वी 'डॉन ३' रखडला अशी चर्चा सुरु झाली. रणवीर सिंह सप्टेंबर महिन्यात बाबा झाला आणि त्यानंतर त्याने ब्रेक घेतल्याची चर्चा होती. पण आता दिग्दर्शक फरहान अख्तरनेच (Farhan Akhtar) यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी'डॉन ३' च्या टायटल अनाऊंसमेंटनंतर सिनेमाबद्दल काहीच अपडेट आलं नव्हतं. त्यामुळे सिनेमा रखडला अशा चर्चा झाल्या. पण आता फरहान अख्तरने नुकतंच एका मुलाखतीत 'डॉन 3' बाबत अपडेट दिलं. तो म्हणाला, "डॉन ३ चं शूट ठरलेल्या शेड्युलप्रमाणेच सुरु होईल. ना ही सिनेमा बंद पडला आहे आणि ना ही रखडला आहे. मी सिनेमासंदर्भातील प्रश्न अजिबातच टाळले नाहीत. डॉन ३ चं शूट याचवर्षी सुरु होणार आहे. तर माझा दुसरा सिनेमा १२० बहादुर या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे."
कोण असणार 'डॉन'ची हिरोईन?
'डॉन ३'चं शूट यावर्षी रिलीज होणार म्हणजे सिनेमा पुढील वर्षी रिलीज होण्याचा अंदाज आहे. चाहत्यांमध्ये डॉन ३ साठी कमालीची उत्सुकता आहे. मात्र शाहरुखच्या जागी रणवीर सिंहला प्रेक्षक डॉन म्हणून स्वीकारतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सिनेमात कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्री असणार आहे. तसंच पहिल्या दोन पार्टप्रमाणेच तिसऱ्या पार्टमध्येही प्रियंका चोप्रा असणार आहे हे अजून गुलदस्त्यातच आहे.