Farhan Akhtar आणि Shibani Dandekar अडकले विवाह बंधनात, कपलचा पहिला फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 15:41 IST2022-02-19T15:31:16+5:302022-02-19T15:41:42+5:30
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding) 19 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले.

Farhan Akhtar आणि Shibani Dandekar अडकले विवाह बंधनात, कपलचा पहिला फोटो आला समोर
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding) 19 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. शिबानी आणि फरहान अख्तर(Farhan Akhtar)च्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत. फोटोत फरहान काळ्या रंगाच्या थ्री-पीसमध्ये तर शिबानी दांडेकर लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाह मुंबई जवळच्या खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये झाला.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सही पोहोचले आहेत. या लग्नाला दोघांच्या कुटुंबियांशिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. साकिब सलीम, रिया चक्रवर्ती, अमृता अरोरा, आशुतोष गोवारीकर, रवीना टंडन यांचे पती अनिल थडानी, शौविक चक्रवर्ती, अनुषा दांडेकर, निर्माता रितेश सिधवानी, चित्रपट निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा आणि एहसान नुरानी, अनेकांनी हजेरी लावली.
photo credit-Aaj tak
48 वर्षीय फरहान अख्तरने 41 वर्षीय गर्लफ्रेंड शिबानी दोघे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत होते. अनेकदा त्यांच्या रोमान्सची झलकही सोशल मीडियावर पाहायला मिळाली. फरहान अख्तर शिबानीला 2015 मध्ये एका शोमध्ये भेटला होता. फरहान अख्तरचे हे दुसरे लग्न आहे. याआधी 2000 मध्ये त्यांनी ब्रिटिश इंग्लिश हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानीसोबत लग्न केले. मात्र परस्पर संमतीने दोघांनी १७ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. फरहान आणि अधुना यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला आणि त्यांना दोन मुले आहेत.