दीपिकाच्या ८ तास शिफ्ट वरून फराह खानने घेतली फिरकी! कुक दिलीपच्या प्रश्नावरही दिलं धमाल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:33 IST2025-09-27T17:33:19+5:302025-09-27T17:33:53+5:30
फराह खान (Farah Khan) तिच्या लेटेस्ट व्लॉगसाठी कुक दिलीप (Cook Dilip) सोबत अभिनेता रोहित सराफच्या (Rohit Saraf) घरी गेली होती. यावेळी तिने दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर खिल्ली उडवली.

दीपिकाच्या ८ तास शिफ्ट वरून फराह खानने घेतली फिरकी! कुक दिलीपच्या प्रश्नावरही दिलं धमाल उत्तर
फराह खान (Farah Khan) तिच्या लेटेस्ट व्लॉगसाठी कुक दिलीप (Cook Dilip) सोबत अभिनेता रोहित सराफच्या (Rohit Saraf) घरी गेली होती. यावेळी तिने दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर खिल्ली उडवली. तिने सांगितले की दीपिका पादुकोण तिच्या शोमध्ये येण्यासाठी खूप व्यग्र आहे. कुक दिलीपने जेव्हा फराहला विचारले की, दीपिका पादुकोण कधी त्यांच्या शोमध्ये पाहुणी म्हणून येणार, तेव्हा फराहने मस्करीच्या स्वरात, अभिनेत्रीच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून तिच्यावर विनोदी टोला लगावला.
फराह खान आणि दिलीप दोघेही रोहित सराफच्या घरी पोहोचले होते. फराहने दिलीपला सांगितले की ते रोहितच्या घरी आहेत. दिलीपला वाटले की बहुधा दिग्दर्शक रोहित शेट्टीची चर्चा होत आहे. त्यामुळे रोहित सराफला पाहून तो चकित झाला आणि म्हणाला, "तुम्ही रोहित शेट्टी नाहीत." तेव्हा फराहने दिलीपला सांगितले की, "प्रत्येक रोहित, रोहित शेट्टी नसतो, हा रोहित सराफ आहे."
यानंतर, फराह खान रोहितची आई अनिता सराफ यांना भेटली आणि त्यांना सांगितले की रोहितने तिला जवळपास एका वर्षापासून शूटसाठी तारीख दिली नाहीये. नंतर रोहितने दिलीपला त्याच्या कुक भानूशी भेटवले. कुक दिलीप लगेच भानूला त्याचा पगार विचारू लागला आणि मग पगार वाढवण्यासाठीची एक खास ट्रिक सांगितली. दिलीप भानूला म्हणाला, "हे लोक तुझा पगार वाढवत नाहीत ना? मी सांगतो की ते पगार कसा वाढवतील. त्यांना जाऊन सांग की पगार वाढवा आणि मग जसे तुम्ही सकाळी झोपेतून उठाल, तेव्हा ते स्वतःहून तुमचा पगार वाढवतील. एक-दोन वेळा बोललात की तिसऱ्यांदा आपोआप वाढवून देतील."
रोहितने सांगितला संघर्षाच्या दिवसांतील अनुभव
तर रोहित सराफने फराहला आपल्या घराची सफर घडवली आणि त्याचबरोबर मुंबईतील संघर्षाच्या दिवसांबद्दलही सांगितले. रोहितने सांगितले की, 'चॅनेल V' मध्ये काम करत असताना त्याला एका शोसाठी ५ हजार रुपये मिळत असत. यावर फराहने लगेच सांगितले की, तिला तर एका शोसाठी फक्त ३०० रुपये मिळत होते आणि त्या काळात ती रक्कम बरीच मोठी होती. या सगळ्या गप्पांमध्येच दिलीपने फराहला पुन्हा एकदा विचारले की, दीपिका पादुकोण तिच्या शोमध्ये कधी पाहुणी म्हणून येणार आहे.
दीपिकाच्या शिफ्टवरून दिलीपचा प्रश्न आणि फराहचा टोला
दिलीपच्या वारंवार विचारण्यावर फराह म्हणाली, "ज्या दिवशी तू गावाला निघून जाशील, त्या दिवशी दीपिका शोमध्ये येईल." त्यानंतर तिने मस्करीत टोला मारत म्हटले, "दीपिका पादुकोण आता फक्त ८ तास शूट करते. तिच्याकडे शोमध्ये येण्यासाठी वेळ नाहीये." हे ऐकून दिलीप लगेच म्हणाला, "मी देखील आतापासून शोसाठी दिवसातून फक्त ८ तास शूट करेन." तेव्हा फराहने त्याला हसत म्हटले, "तू तर सध्या दिवसातून फक्त २ तास शूट करतोस, आतापासून तू देखील ८ तास शूट कर!"